मुंबई: भविष्यातील फायनॅन्शियल सिक्युरिटीसाठी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एलआयसी) पॉलिसींना सर्वांत सेफ पर्याय मानलं जातं. देशातील सर्वांत मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या सर्व योजनांमध्ये देशातील कोट्यवधी नागरिकांनी गुंतवणूक केलेली आहे.
एलआयसीकडे सर्व वयोगटांतील ग्राहकांसाठी योजना विविध विमा पॉलिसी आहेत. या विमा पॉलिसींमधून आर्थिक सुरक्षा आणि बचत या दोन्ही गोष्टी मिळतात. 'जीवन लाभ योजना' ही अशीच एक पॉलिसी आहे. ही योजना पॉलिसीधारकांना मुदतपूर्तीनंतर एकरकमी पैसे देते. या शिवाय, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतही मिळते. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तुम्हाला जीवन लाभ पॉलिसीतून 54 लाख रुपयांची रक्कम मिळवायची असेल, तर तुम्हाला 25 वर्षांच्या मुदतीची पॉलिसी घ्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला विम्यासाठी 20 लाख रुपयांची रक्कम निवडावी लागेल. असं केल्यास तुम्हाला दरवर्षी 92 हजार 400 रुपये प्रीमिअम म्हणून जमा करावे लागतील.
तुम्हाला दरमहा सात हजार 700 रुपये आणि दररोज 253 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही घेतलेल्या जीवन लाभ पॉलिसीची मुदत संपल्यानंतर शेवटी तुम्हाला 54.50 लाख रुपये मिळतील. 54 लाख रुपये देणाऱ्या 25 वर्षांच्या मुदतीची पॉलिसी घेण्यासाठी व्यक्तीचं वय कमीतकमी 18 वर्षं आणि जास्तीतजास्त वय 50 वर्षं असलं पाहिजे.
कालावधीनुसार वयाच्या अटीत बदल
एलआयसीच्या मते, जर एखाद्या व्यक्तीनं 21 वर्षे मुदतीची पॉलिसी निवडली, तर त्यासाठी पॉलिसी घेताना तिचं वय 54 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे. 25 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी, व्यक्तीची वयोमर्यादा जास्तीतजास्त 50 वर्षे असावी. पॉलिसीच्या परिपक्वतेसाठी कमाल वयोमर्यादा 75 वर्षे ठेवण्यात आली आहे.
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला लाभ मिळतो. विमा कंपनी बोनससोबत, विम्याच्या रकमेचा लाभही नॉमिनीला देते. विशेष म्हणजे एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती कर्जही घेऊ शकतात.
एलआयसीची ही पॉलिसी एक नॉन-लिंक्ड योजना आहे. म्हणजेच ती शेअर बाजारावर अवलंबून नाही. यामुळेच ही योजना अधिक सुरक्षित मानली जात आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम सुरक्षित करू शकता आणि चांगले फायदेही मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.