अमेरिकन मॅगझिन फोर्ब्स (Forbes) कडून दरवर्षी जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली जाते. भारतासाठी जारी करण्यात आलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये काही महिलांचा समावेश देखील आहे.
या यादीमध्ये सर्वात श्रीमंत भारतीय महिला (Richest Indian Women)या स्थानावर ओपी जिंदल ग्रृपच्या (Jindal Group) च्या सावित्री जिंदल (Savitti Jindal) यांना जागा मिळाली आहे. सर्व श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये त्यांचा क्रमांक 19वा आहे. सावित्री जिंद OP Jindal Group च्या प्रमुख आहेत. त्यांची संपत्ती 2019 च्या तुलनेत वाढून 2020 मध्ये 42,415 कोटी झाली आहे.
किरण मजूमदार शॉ- फोर्ब्सच्या यादीनुसार श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये किरण मजूमदार शॉ (Kiran Mazumdar Shaw) यांची संपत्ती गेल्यावर्षीपेक्षा सर्वाधिक वेगाने वाढली आहे. मात्र नेटवर्थच्या दृष्टीने त्या दुसरी भारतीय श्रीमंत महिला आहेत. त्यांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 93.28 टक्क्यांनी वाढून 33,639 कोटी झाली आहे. त्यांच्या नेटवर्थमध्ये झालेली सर्वाधिक वाढ केवळ महिलांच्या श्रेणीमध्ये नसून टॉप 100 श्रीमंताच्या तुलनेत आहे. किरण मजूमदार शॉ बायोटेक कंपनी बायोकॉनच्या चेअरमन आणि एमडी आहेत. त्याचप्रमाणे त्या आयआयएम बंगळुरूच्या अध्यक्ष आहेत.
विनोद राय गुप्ता - या यादीमधील टॉप 5 महिलांमध्ये केवळ विनोद राय गुप्ता (Vinod Rai Gupta) आहेत ज्यांच्या संपत्तीमध्ये घसरण झाली आहे. तरी देखील त्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 40व्या स्थानावर आहेत, तर श्रीमंत महिलांमध्ये तिसऱ्या स्थानावर. त्यांच्या संपत्तीत गेल्यावर्षी पेक्षा 3,291 कोटींची घट होऊन संपत्ती 25,961 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विनोद राय गुप्ता हेवल्स इंडियाच्या प्रमुख आहेत.
लीना तिवारी- फोर्ब्सच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये लीना तिवारी (Leena Tiwari) चौथ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 2019 मध्ये 14,041 कोटी होती, त्यामध्ये वाढ होऊन 2020 मध्ये संपत्ती 21,939 कोटी झाली आहे. एका वर्षात त्यांच्या संपत्तीत सुमारे 56.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. लीना तिवारी यूएसव्ही इंडियाच्या प्रमुख आहेत.
मल्लिका श्रीनिवासन - जगभरात तिसरी आणि भारतातील दुसरी सर्वाधिक ट्रॅक्टर बनवणारी कंपनी ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेट लिमिडेटच्या चेअरमन मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये 58व्या स्थानावर आहेत. सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्या पाचव्या आहेत. त्यांची संपत्ती 17,917 कोटी आहे. त्यांच्या कंपनीचा कारभार 100 हून अधिक देशात चालतो.