मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आधार कार्डबाबत 'ही' चूक अनेकजण सर्रासपणे करतात; तुम्ही फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

आधार कार्डबाबत 'ही' चूक अनेकजण सर्रासपणे करतात; तुम्ही फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

सामान्य आधार कार्डप्रमाणे UIDAI द्वारे जारी केलेल्या मास्क्ड आधार कार्ड ID मध्ये सर्व क्रमांक दिसत नाहीत. यामध्ये फक्त शेवटचे चार अंक दिसतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 4 सप्टेंबर : आधारकार्ड सध्याच्या घडीला महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कागदपत्रांमध्ये आधारकार्डचा समावेश असतोच. मात्र अॅड्रेस प्रुफ, आयडी प्रुफसाठी आपण आधार कार्ड शेअर करत असताना आधार नंबर देखील शेअर करतो. हीच बाब जास्त धोकादायक ठरु शकते. तुमचा आधार क्रमांक सर्रास शेअर केल्याने तुमची फसवणूक होण्याचा धोका वाढतो. हा धोका ओळखून सरकारने एक सुविधा सुरु केली आहे. UIDAI ने फसवणूक टाळण्यासाठी सरकारने मास्क्ड आधार सुरू केला आहे.

सामान्य आधार कार्डप्रमाणे UIDAI द्वारे जारी केलेल्या मास्क्ड आधार कार्ड ID मध्ये सर्व क्रमांक दिसत नाहीत. यामध्ये फक्त शेवटचे चार अंक दिसतात. आधार कार्डचे पहिले 8 आधार क्रमांक मास्क्ड आधार कार्ड आयडीमध्ये 'XXXX-XXXX' असे लिहिलेले असतात. अशाप्रकारे आधार कार्डधारकाचा आधार कार्ड क्रमांक अनोळखी व्यक्तींसाठी लपवला जातो. यामुळे आधारचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळता येईल.

मास्क आधार PDF स्वरूपात देखील उपलब्ध आहे. तो पासवर्डने सुरक्षित केलेला आहे. डाउनलोड केल्यानंतर, एक मास्क्ड आधार कार्ड पासवर्ड तुमच्या ईमेलवर पाठवला जातो. कोणत्याही प्रकारच्या गैरवापरापासून संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी, आधार कार्ड धारक आपले मास्क्ड आधार कार्ड 6 सोप्या स्टेप्समध्ये ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.

मास्क्ड आधार कार्ड कसं डाऊनलोड कराल?

>> प्रथम, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा आणि 'आधार डाउनलोड करा' पर्यायावर क्लिक करा.

>> आधार / व्हीआयडी / नावनोंदणी आयडी पर्याय निवडा आणि मास्क्ड आधार पर्यायावर टिक करा.

>> मागितलेली माहिती येथे भरा आणि 'OTP Request' पर्यायावर क्लिक करा.

>> तुमच्या आधार-नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. ओटीपी एंटर करा आणि 'आधार डाउनलोड करा' वर क्लिक करा. >> आता, तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाउनलोडसाठी उपलब्ध असेल.

First published:

Tags: Aadhar card, UIDAI