मराठी बातम्या /बातम्या /मनी /नववर्षात Cibil Score चांगला ठेवण्याचा संकल्प करा आणि स्वत:चं क्रेडिट वाढवा, या स्टेप्स करा फॉलो

नववर्षात Cibil Score चांगला ठेवण्याचा संकल्प करा आणि स्वत:चं क्रेडिट वाढवा, या स्टेप्स करा फॉलो

तुमचे क्रेडिट कार्ड बिल असो किंवा कर्जाचा हप्ता (EMI) वेळेत भरण्याची सवय लावा. तुमच्या नावावर थकबाकी असेल तर क्रेडिट रेटिंगवर (Credit Rating) त्याचा परिणाम होतो.

तुमचे क्रेडिट कार्ड बिल असो किंवा कर्जाचा हप्ता (EMI) वेळेत भरण्याची सवय लावा. तुमच्या नावावर थकबाकी असेल तर क्रेडिट रेटिंगवर (Credit Rating) त्याचा परिणाम होतो.

तुमचे क्रेडिट कार्ड बिल असो किंवा कर्जाचा हप्ता (EMI) वेळेत भरण्याची सवय लावा. तुमच्या नावावर थकबाकी असेल तर क्रेडिट रेटिंगवर (Credit Rating) त्याचा परिणाम होतो.

मुंबई, 2 एप्रिल : नवीन वर्षात अनेकजण विविध संकल्प करत असतात. त्यात आर्थिक नियोजनाचाही समावेश असते. नवं आर्थिक वर्ष आणि मराठी नववर्ष सुरु झाल्याने तुम्हीही आपलं क्रेडिट वाढवण्याचा संकल्प करणे गरजेचं आहे. घर (Home Loan), वाहन (Auto Loan) खरेदी यासह वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळते. मात्र बँकेची फसवणूक होऊ नये यासाठी सिबिल स्कोअर (what is Cibil Score) हा उपाय काढण्यात आला आहे. बँकेला कर्जदाराच्या कर्ज फेडण्याची या सिबिल स्कोअरवरुन यावरून कळते. हा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरुन तुम्हाला कर्ज सहज आणि कमी व्याजदरावर उपलब्ध होईल. सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काही टिप्स उपयोगी ठरतील.

कर्ज वेळेवर फेडा

तुमचे क्रेडिट कार्ड बिल असो किंवा कर्जाचा हप्ता (EMI) वेळेत भरण्याची सवय लावा. तुमच्या नावावर थकबाकी असेल तर क्रेडिट रेटिंगवर (Credit Rating) त्याचा परिणाम होतो. कर्जाचा ईएमआय वेळेत न भरल्यास दंड आकारला जातो आणि त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या कर्जाच्या हप्त्याची तारीख चुकवू नका आणि तो वेळेवर भरा.

महागाईचा भडका सुरूच! डाळ, तांदूळ, बिस्किटं, मसाल्यांसह या वस्तू महागल्या; पाहा किती वाढल्या किमती

एकाचवेळी मोठी कर्जे घेऊ नका

एकावेळी मोठी कर्जे घेऊ नका. दुसरे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे पहिले कर्ज फेडले आहे याची खात्री करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत नाही. तुम्ही एकावेळी मोठी कर्ज घेतली असतील तर बँकेला तुम्ही त्याची वेळेत परतफेड कराल याबद्दल शंका वाटू शकते.

सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज एकावेळी घ्या

अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी कर्जं घ्यावी लागतात. अशावेळी कर्ज घेताना त्यात सुरक्षित (Secured) आणि असुरक्षित (Unsecured) कर्जाचा समावेश आहे याची खात्री करा. गृह कर्ज आणि वाहन कर्ज हे सुरक्षित कर्जाखाली येतात. तर, क्रेडिट कार्ड कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज असुरक्षित कर्जे आहेत.

पैसे नसतानाही रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बूक करा, Paytm ची नवी सेवा; चेक करा प्रोसेस

क्रेडिट कार्ड मर्यादा संपवू नका

तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर तुमच्या क्रेडिट कार्डची (know your Credit Card limit) मर्यादा संपूर्णपणे संपवू नका. एका महिन्यात तुमच्या कार्डावर क्रेडिट मर्यादेच्या फक्त 30 टक्के खर्च करा. उदाहरणार्थ, तुमची क्रेडिट मर्यादा दरमहा 1 लाख रुपये असेल तर तुमचा खर्च फक्त 30,000 रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा.

क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवा

तुमची क्रेडिट कार्डवरील रकमेची परतफेड चांगली असेल तर तुमची बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवरील क्रेडिट मर्यादा (Credit Limit) वाढवण्यास सांगू शकते. ही वाढलेली क्रेडिट मर्यादा खर्च करताना वापरली नाही तर त्याचा उपयोग तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहण्यासाठी होईल. क्रेडिट मर्यादा वाढवली म्हणून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरील खर्च वाढवला पाहिजे असे नाही. क्रेडिट मर्यादा जास्त ठेवा, परंतु खर्च मर्यादित करा, ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर आणखी सुधारेल.

आपल्या कर्ज अहवालात कोणतीही त्रुटी नाही याची खात्री करा

तुमच्या कर्ज अहवालात म्हणजेच क्रेडिट रिपोर्टमध्ये (Credit Report) काहीही त्रुटी नाही याची खात्री करा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या वैयक्तिक कर्जाची पूर्ण परतफेड केली आहे; पण अहवालात तशी नोंद झालेली नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होईल. त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर तपासा आणि त्यात काही चूक, त्रुटी राहिलेली नाही याची खात्री करून घ्या. या काही बाबींची काळजी घेतली तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहण्यास मदत होईल, आणि तुम्हाला कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

First published:

Tags: Bank services, Loan, Money