नवी दिल्ली, 26 जानेवारी: जर तुम्ही देखील कार घेण्याचं स्वप्न पाहत असाल, पण सध्या तुमचा केवळ सेकंड हँड गाडी (Second Hand Car) घेण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अशाप्रकार कार खरेदीसाठी देखील अनेक बँका कर्जाची (Car Loan) सुविधा देत आहेत. दरम्यान कोणती बँक सर्वात कमी दराने व्याज देत आहे हे तपासून पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा 20 बँकांच्या ऑटो लोन रेट्सबद्दल सांगणार आहोत जे सर्वात कमी आहेत. सध्या कोरोना काळात स्वत:ची गाडी असावी असा विचार वाढू लागला आहे, परिणामी गाड्यांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे बँकांनी सेकंड हँड गाड्यांवर देखील कर्ज देण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही सेकंड हँड गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला 5 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा मिळू शकते. विशेष बाब अशी आहे की तुम्हाला कमी व्याजदरात ही सुविधा मिळते आहे. **(हे वाचा- ही बँक देत आहे खास सुविधा, आयुष्यभरासाठी Credit Card मोफत तर मिळतील या ऑफर्स )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.