मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फ्लिपकार्टचा ग्राहकांना जोरदार झटका; शॉपिंगवेळी `हा` पर्याय निवडल्यास द्यावा लागणार अतिरिक्त चार्ज

फ्लिपकार्टचा ग्राहकांना जोरदार झटका; शॉपिंगवेळी `हा` पर्याय निवडल्यास द्यावा लागणार अतिरिक्त चार्ज

फ्लिपकार्टचा ग्राहकांना जोरदार झटका; शॉपिंगवेळी `हा` पर्याय निवडल्यास द्यावा लागणार अतिरिक्त चार्ज

फ्लिपकार्टचा ग्राहकांना जोरदार झटका; शॉपिंगवेळी `हा` पर्याय निवडल्यास द्यावा लागणार अतिरिक्त चार्ज

तुम्ही जर फ्लिपकार्टवरून खरेदी केली आणि त्यावेळी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला तर तुम्हाला आता त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज अर्थात अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 ऑक्टोबर: आता ई-कॉमर्स वेबसाईट्स हा खरेदीसाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आणि कोणत्याही वेळी अगदी क्लिकवर हवी ती वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही खरेदी केलेली वस्तू सुरक्षितपणे तुम्हाला घरपोच मिळते. याशिवाय ई-कॉमर्स वेबसाईट्सवर वस्तू खरेदीवर विशेष सूट, ऑफर, डिस्काउंट आणि कॅशबॅकचा लाभदेखील तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे शॉपिंगसाठी प्रवास करून बाजारात जाण्याची गरज उरली नाही. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, जिओ मार्ट आदी ई-कॉमर्स वेबसाईट्सवरून तुम्ही ग्रोसरी, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, औषधं खरेदी करू शकता. बंपर डिस्काउंट डिलसाठी तुम्ही यापैकी फ्लिपकार्ट वरून शॉपिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण फ्लिपकार्टवरून खरेदी करणं आता काहीसं महागणार आहे. जे ग्राहक खरेदीवेळी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ हा पर्याय निवडत असतील तर त्यांना आता या पर्यायासाठी सरसकट अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

ई-कॉमर्स वेबसाईट्सपैकी फ्लिपकार्ट हा सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म मानला जातो. परंतु, फ्लिपकार्टनं आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. शॉपिंग करतेवेळी पेमेंटसाठी यूपीआय पेमेंट, क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंट, कॅश ऑन डिलिव्हरीसारखे अनेक पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही जर फ्लिपकार्टवरून खरेदी केली आणि त्यावेळी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला तर तुम्हाला आता त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज अर्थात अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे. फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडलेल्या ऑर्डरवर हँडलिंग फी आकारण्यास सुरुवात केली आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे.

हेही वाचा: प्रसिद्ध चिनी कंपनीने भारतातील इतर व्यवसाय केले बंद; आता फक्त...

आतापर्यंत फ्लिपकार्ट केवळ 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ऑर्डरवर डिलिव्हरी चार्ज आकारत होता. जर एखाद्या ग्राहकाने 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यावर 40 रुपये अतिरिक्त डिलिव्हरी चार्ज आकारला जायचा. दुसरीकडे 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यावर कोणताही डिलिव्हरी चार्ज आकारला जात नसे. मात्र आता फ्लिपकार्टने हा नियम बदलला असून, 500 रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यावरही हा चार्ज द्यावा लागणार आहे.

जर तुम्ही फ्लिपकार्टवर शॉपिंग केल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला तर तुम्हाला सरसकट प्रत्येक ऑर्डरसाठी पाच रुपये डिलिव्हरी चार्ज द्यावा लागणार आहे. जर तुम्हाला हा एक्स्ट्रा चार्ज द्यायचा नसेल तर तुम्ही फ्लिपकार्टवर खरेदी करतेवेळी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडू शकता. कॅश ऑन डिलिव्हरी या ऑप्शनच्या खाली तुम्हाला याविषयीची माहिती मिळेल. जास्तीतजास्त ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडावा आणि कॅश ऑन डिलिव्हरीच्या ऑर्डर्स कमी व्हाव्यात, या उद्देशानं फ्लिपकार्ट कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

First published:

Tags: Flipkart, Online shopping