जाहिरात
मराठी बातम्या / मनी / शेतीही होणार 5G! आता तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात येणार क्रांती, हे आहेत 4 मार्ग

शेतीही होणार 5G! आता तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात येणार क्रांती, हे आहेत 4 मार्ग

शेतीही होणार 5G! आता तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात येणार क्रांती, हे आहेत 4 मार्ग

पारंपरिक शेतीच्या पद्धती (Farming Techniques) 5G तंत्रज्ञानात विलीन केल्यास कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारी पाऊल ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 10 फेब्रुवारी: 5G तंत्रज्ञानाच्या (5G technology) आगमनामुळे तसंच डिजिटल सेवा (Digital Services) आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात झपाट्यानं वाढ झाल्यामुळे, येत्या काळात आपण ‘टेक्नोलॉजिकल रिव्होल्युशनचे’ (Technological Revolution) साक्षीदार होऊ शकतो. असं रिव्होल्युशन जिथं सर्वगोष्टी स्मार्ट (Smart) असतील. आश्चर्यकारक इंटरनेट स्पीड (Internet Speed) देण्याबरोबरच 5G नेटवर्क हे व्यवसाय आणि इतर क्षेत्रातदेखील क्रांती घडवू शकतं. तंत्रज्ञानानं आपल्या जीवनात अविभाज्य स्थान मिळवलं आहे. आता फक्त एका क्लिकवर आपण थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) कनेक्ट होऊ शकतो. अनेक उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापरही सामान्य झाला आहे. मात्र, शेतीसारख्या (Agriculture) महत्त्वपूर्ण क्षेत्रात अजूनही तंत्रज्ञानाचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. अजूनही शेती क्षेत्रातील कामं करण्यासाठी लोक पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देतात आणि कालबाह्य साधनांवर अवलंबून राहतात. पण, आता यामध्ये बदल होऊ शकतो. पारंपरिक शेतीच्या पद्धती (Farming Techniques) 5G तंत्रज्ञानात विलीन केल्यास कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारी पाऊल ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. हे वाचा- Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोने दरात वाढ, किती आहे 1 तोळ्याचा आजचा भाव एका अहवालानुसार, दूरसंचार विभाग (DoT) आणि दळणवळण मंत्रालय (Ministry of Communications) कृषी क्षेत्रात 5G तंत्रज्ञानाच्या वापराच्या शक्यता तपासत आहे. त्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत (Telecom Operators) हात मिळवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे, कृषी क्षेत्रात जर 5G चा वापर यशस्वी झाला तर काय बदल होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया… स्मार्ट इरिगेशन (Smart irrigation) इरिगेशन म्हणजे सिंचन ही शेतीतील सर्वात महत्वाची बाब आहे. कारण, पिकं त्यांच्या पाण्याच्या गरजांसाठी सिंचनावर अवलंबून असतात. चांगलं उत्पादन येण्यासाठी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी आवश्यक असतं. 5G तंत्रज्ञानाच्या वापरानं शेतकरी अधिक प्रभावी सिंचन करू शकतात. मातीत पुरलेल्या ‘सॉईल प्रोब’चा (Soil Probes) आणि 5G-कनेक्‍टिव्हिटीचा एकत्र वापर करता येऊ शकतो. या उपकरणांमध्ये आर्द्रता (Moisture Content), मातीचे नमुने आणि क्षारता (Salinity) यासारखा डेटा कॅप्चर करण्याची क्षमता आहे. यामुळं शेतकऱ्याला त्याच्या पिकांच्या स्थितीची अचूक माहिती मिळेल. हे वाचा- Petrol Diesel Prices Today: इंधन दरात बदल नाही, तरीही पेट्रोल 100 पार AI पॉवर्ड मशीन्स (AI-powered machines) पारंपरिक शेती यंत्रांची क्षमता वाढवणं या गोष्टीचादेखील स्मार्ट शेतीमध्ये (Smart Farming) समावेश होतो. शेतकरी त्यांची विविध मशिन्स 5G द्वारे कनेक्ट करू शकतात. यामुळं त्यांना शेतीतील कामांचा रिअल-टाइम डेटा मिळू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं (Artificial Intelligence) मनुष्यबळाचा प्रश्न सुटून शेती यांत्रिक पद्धतीनं करता येऊ शकते. अॅप्लिकेशन्स (Applications) कृषी-आधारित अॅप्लिकेशन्सचा (Agriculture-oriented applications) वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत कार्यक्षम आणि प्रभावी ठरू शकतो. स्मार्टफोनमधील 5G-एनेबल्ड अॅप्लिकेशन्स शेतकऱ्यांना हवामान(Weather), पाऊस (Rainfall) आणि या क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाचा रीअल-टाइम डेटा देऊ शकतात. अॅप्लिकेशन्समुळं शेतकरी मार्केटमधील घटकांबाबत अपडेट राहू शकतो. त्यांना बियाणं, किटकनाशकांच्या सध्याच्या किमती आणि त्यांच्या उत्पादनाचं बाजारमूल्यदेखील (Market Value) सहज कळू शकेल. हे वाचा- दरमहा 210 रुपये भरा अन् निवृत्तीनंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवा! पशुधन व्यवस्थापन (Livestock management) 5G तंत्रज्ञान पशुपालन क्षेत्रातदेखील क्रांती आणू शकतं. 5Gचा वापर करून शेतकरी त्यांच्या गुरांच्या (Cattle) आरोग्यावर लक्ष ठेवू शकतात. इतकच नाही तर, जिओ-लोकेशनवापरून (Geo-location) त्यांच्या हालचालींचा मागोवाही घेऊ शकतात. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांचं खाणं-पिणं, प्रजनन क्षमता (Fertility) आणि इतर गोष्टींबद्दल महत्त्वपूर्ण डेटा मिळवून देऊ शकतं. यामुळं पशुपालनाचं उत्तम व्यवस्थापन आणि नियोजन होईल. परिणामी या क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. जर कृषी क्षेत्रात 5G तंत्रज्ञानाचा सक्रीय वापर झाला तर नक्कीच क्रांती होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात