मराठी बातम्या /बातम्या /मनी /Financial Tips : कर्जमुक्त होण्यासाठी 'या' पाच खास टिप्स, आर्थिक नियोजन करून व्हा टेन्शन फ्री

Financial Tips : कर्जमुक्त होण्यासाठी 'या' पाच खास टिप्स, आर्थिक नियोजन करून व्हा टेन्शन फ्री

कर्जमुक्त होण्यासाठी 'या' पाच खास टिप्स, आर्थिक नियोजन करून टेन्शन फ्री व्हा

कर्जमुक्त होण्यासाठी 'या' पाच खास टिप्स, आर्थिक नियोजन करून टेन्शन फ्री व्हा

पैशांची गरज असली की आपण लोनचा पर्याय निवडतो. खरं तर कमी वेळेत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोन हा एक लोकप्रिय मार्ग आहे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : बऱ्याचदा आपल्याला पैशांची गरज असली की आपण लोनचा पर्याय निवडतो. खरं तर कमी वेळेत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोन हा एक लोकप्रिय मार्ग आहे परंतु, वाढते व्याजदर आणि कर्जाचा कालावधी यामुळे सध्याच्या काळात लोन घेणं महाग झालंय. विशेषत: अशा लोकांसाठी जे एकापेक्षा जास्त लोन घेऊन मॅनेज करत आहेत. जास्त लोन एकाच वेळी फेडत असताना अशा परिस्थितीत कर्जमुक्त होणं थोडं अवघड वाटू लागतं. पण ते अशक्य नक्कीच नाही. योग्य आर्थिक नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही कर्जाची परतफेड करून कर्जमुक्त होऊ शकता. जर तुम्हाला 2023 मध्ये कर्जमुक्त व्हायचं असेल, तर आज आम्ही तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचं आर्थिक व्यवस्थापन करू शकता. तसंच तुमच्यावर असलेल्या लोनची परतफेड करून कर्जमुक्त होऊ शकता.

तुमचे थकित कर्ज समूजन घ्या

तुमच्या सर्व कर्जांची अचूक स्थिती समजून घ्या. त्याची यादी तयार करा आणि तुम्ही भरत असलेल्या सर्व ईएमआयचा विचार करा, त्यानंतर प्रत्येक कर्जाच्या बाबतीत तुम्ही रिपेमेंटच्या कोणत्या टप्प्यात आहात याची नोंद घ्या. तुमची छोटी कर्जे ज्यांचा कालावधी 3 वर्षांपर्यंत आहे, त्यांची आधी परतफेड करण्यास प्राधान्य द्या. जर, दीर्घकालीन कर्जांची परतफेड करायला तुम्ही नुकतीच सुरुवात केली असेल, तर त्यासाठी थोडं थांबा. यामुळे तुम्हाला तुमच्या सध्याच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची अचूक कल्पना येईल. लहान कर्जं आधी फेडल्यास त्याचा बोजा कमी होईल आणि दीर्घकालीन कर्ज फेडणं सोपं जाईल.

खर्च कमी करा, बचत जास्त करा

हे ही वाचा : पेन्शनर्ससाठी बँक ऑफ इंडिया देतंय खास सुविधा, वाचा कसा घ्यायचा लाभ

तुमचे महिन्याचे खर्च कमी करा आणि ते खर्च ओळखा जे तुम्ही पूर्णपणे थांबवू किंवा कमी करू शकता. पैसे वाचवण्यासाठी नवीन मोठ्या किंवा अनावश्यक खरेदी करण्यापासून दूर राहा. बाहेर जेवण, वीकेंड ट्रिप आणि इंधन यांसारख्या खर्चांत कपात करा आणि तुमची बचत वाढवा.

जर तुम्ही महागड्या भाड्याच्या घरात राहत असाल, तर लहान घरात किंवा इतर ठिकाणी जाण्याचा विचार करा जिथे तुम्हाला कमी भाडे द्यावं लागेल. तुमच्या कर्जांची वेळेआधी परतफेड करण्यासाठी आणि त्यांचा कार्यकाळ कमी करण्यासाठी पगारवाढ किंवा बोनस इत्यादींचा वापर करा.

डेट कन्सॉलिडेशन लोनचा विचार करा

कर्ज कमी करण्यासाठी डेट कन्सॉलिडेशन लोन हा एक परवडणारा पर्याय आहे. ही निश्चित-व्याज कर्जे असतात, जी तुमच्या एकापेक्षा जास्त कर्जांना एकाच कर्जात एकत्रित करता येतात. यामध्ये तुम्हाला EMI आणि व्याज पेमेंटवर बचत करण्यात मदत होते.

उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डमधील बचत असलेली रक्कम 29%-42% च्या सरासरी APR ऐवजी 30% च्या वार्षिक टक्के दराने आपल्या होम लोनसह कन्सॉलिडेट करून त्याची परतफेड करू शकता. त्यावर 8% शुल्क आकारलं जातं. डेट कन्सॉलिडेशन लोन घेण्यापूर्वी, त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होईल ते तपासून घ्या.

तसंच, तुमच्या विद्यमान कर्जावर लागू होणारे प्री-क्लोजर चार्ज आणि नवीन कर्जासाठी प्रोसेसिंग शुल्कात काय फरक पडतो, तेही तपासून घ्या. हे कर्ज घेतल्याने तुमची कर्ज फेडण्यात बचत होईल की नाही याची गणना करा. तुमच्या कर्जाचा बोजा नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त खर्च करणे किंवा गरज नसल्यास अतिरिक्त कर्ज घेणे टाळा.

बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्ड निवडा

तुम्ही व्याजाचा बोजा कमी करून कर्ज लवकर फेडण्याच्या विचारात असाल तर बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्ड चांगला पर्याय आहे. ही सुविधा निवडक क्रेडिट कार्डवर दिली जाते. यामुळे तुम्ही उच्च व्याज कार्डावरील कर्ज कमी व्याज दर बॅलन्स ट्रान्सफर कार्डात ट्रान्सफर करू शकतात. तसेच काही बँका इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून बॅलन्स ट्रान्सफर कार्डावर शून्य व्याजाची ऑफरही देतात.

बोनस आणि पगारातून छोट्या लोनची परतफेड करा

कार किंवा पर्सनल लोन यासारख्या कमी कालावधीतील लोनची परतफेड करण्यासाठी पगारवाढ आणि बोनस हे उत्तम पर्याय ठरू शकतात. याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कर्ज फेडण्यास मदत घेऊ शकता. आपला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तसेच होम लोन सारख्या दीर्घकालीन कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही तुमच्या नियमीत उत्पन्नातील पैशांचा वापर करणं सुरू ठेवू शकता.

हे ही वाचा : Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम

कर्ज-मुक्त होणं ही बाब किंवा ही प्रक्रिया सुरुवातीला खूप कठीण, अवघड वाटू शकते, पण ती अशक्य मात्र नक्कीच नाही. तुम्ही कर्जमुक्त होण्याचं तुमचं लक्ष्य गाठण्यासाठी आर्थिक शिस्त पाळणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कमवत असलेले पैसे विवेकपूर्वक खर्च करणं कायम लक्षात ठेवा. तसेच जिथे शक्य असेल तेथे बचत करा.

First published:
top videos

    Tags: Home Loan, Loan, Money, Money matters