मुंबई: लाईफ सर्टिफिकेट बँकेत फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला पेन्शन मिळणार नाही हे देखील आपण समजून घेतलं. पेन्शनधारक किंवा वयोवृद्धांसाठी बँका वेगवेगळ्या सुविधा आणत असते. आता बँक ऑफ इंडियाने पेन्शनधारकांसाठी खास बचत खात्याची सुविधा आणली आहे.
पेन्शन धारकांना आता बँक ऑफ इंडियामध्ये बचत खातं उघडता येणार आहे. यावर पेन्शनधारकांना वेगवेगळ्या सुविधांचा लाभही मिळणार असल्याचं बँकेनं सांगितलं आहे. बँकेनं ट्वीटमध्ये म्हटलं की, आता आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नवी सुरुवात करा आणि तुमची सगळी स्वप्नं पूर्ण करा. पेन्शनर्सनी आज बँक ऑफ इंडियामध्ये बचत खातं उघडा, असं आवाहन केलं आहे.
कोणत्या सुविधा मिळणार
ज्या ग्राहकांनी या योजनेअंतर्गत खातं सुरू केलं आहे त्यांना वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 500000 पर्यंत अपघात विमा कव्हर मिळणार आहे. किफायतशीर मेडिक्लेम पॉलिसी देखील ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय ग्राहक ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम
अब ज़िंदगी की दूसरी पारी में एक नयी शुरुआत कर अपने सारे सपने पूरे करें। आज ही बैंक ऑफ़ इंडिया में पेंशनर्स बचत खाता खोलें।#AmritMahotsav #BankofIndia #PensionersAccount pic.twitter.com/3fl9kpUKlb
— Bank of India (@BankofIndia_IN) December 27, 2022
बँक ऑफ इंडियामध्येमध्ये वृद्धांसाठी 6.00 ते 6.75 % पर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर देखील देण्यात आले आहेत. 60 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते उघडू शकतो. निवृत्त कर्मचारी वयाच्या 55 व्या वर्षीही खाते उघडू शकतात. जर तुम्ही संरक्षण खात्याचे कर्मचारी असाल तर तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षीही खाते उघडण्याची परवानगी आहे.
New Year आधी बँकेनं ग्राहकांना दिली गुडन्यूज, Fixed Deposit वरच्या व्याजदरात वाढ
खातं उघडताना किमान हजार रुपये जमा करून तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते उघडू शकता. जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत तुम्ही जमा करू शकता. १० ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान जमा केलेली कोणतीही रक्कम १० रुपयांच्या पटीत असावी. एक लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम जमा करता येते, यापेक्षा अधिक रक्कम चेकद्वारे जमा करावी लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pension, Pension scheme