Home /News /money /

देशाच्या अर्थसंकल्पासोबत तुमचंही फायनान्शियल प्लानिंग करा; आर्थिक संकटात अडकणार नाही

देशाच्या अर्थसंकल्पासोबत तुमचंही फायनान्शियल प्लानिंग करा; आर्थिक संकटात अडकणार नाही

जीवन सोपं बनवण्यासाठी आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial planning) खूप महत्त्वाचे आहे. यासाठी सरकारप्रमाणेच सामान्य माणसांनीही अर्थसंकल्प बनवणे अत्यंत गरजेचे आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहे. अर्थसंकल्पाला अवघे काही दिवस उरले आहेत. सरकार बजेटला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराच्या आर्थिक व्यवहारांचा आणि योजनांचा लेखाजोखा असतो. जीवन सोपं बनवण्यासाठी आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial planning) खूप महत्त्वाचे आहे. यासाठी सरकारप्रमाणेच सामान्य माणसांनीही अर्थसंकल्प बनवणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या अर्थसंकल्पात भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी काय आवश्यक आहे, या गोष्टी येथे चर्चिल्या जात आहेत. बजेट तयार करा (Make Budget) कोणतेही घर नीट चालवायचे असेल तर घराचा सर्व खर्च आणि उत्पन्न याबाबतचे उद्दिष्ट स्पष्ट असले पाहिजे. या अर्थसंकल्पाच्या उत्पन्नामध्ये पगाराचे उत्पन्न, मालमत्तेतून भाड्याचे उत्पन्न, खर्चाची रक्कम, कोणत्याही योजनेवर मिळणारे व्याज इत्यादींचा समावेश होतो. कौटुंबिक अर्थसंकल्पातील खर्चामध्ये कर्ज, कर्जावरील व्याज, मासिक घरखर्च, मुलांचे शिक्षण इत्यादी आणि वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो. तुमच्याकडे पॅनकार्ड असल्यास वाचवू शकता 1000 रुपये, फक्त एक काम करावं लागेल? कर्जमुक्ती (Debt Free) तणावमुक्त जीवनासाठी कोणत्याही प्रकारच्या कर्जापासून मुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत कर्ज न घेणे आवश्यक आहे आणि जर कर्ज आधीच चालू असेल तर ते लवकरात लवकर उतरवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्रेडिट कार्डची बिले आधी भरा. कारण, क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर भरपूर व्याज आकारले जाते. खरेदी करताना सहसा रोखीने करा म्हणजे पैसे असतील तितकाच खर्च होईल. आपत्कालीन निधी (Emergency Fund) कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्कालीन निधी असणे अत्यंत आवश्यक आहे. आपत्कालीन निधी किमान सहा महिन्यांचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा असावा. आपत्कालीन निधी असल्यास अल्पकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत होईल. हा निधी नोकरी किंवा व्यवसाय गमावणे, वैद्यकीय आणीबाणी इत्यादीसारख्या अचानक परिस्थितीत मोठी मदत प्रदान करतो. Multibagger Stock : एक लाखाचे 50 लाख फक्त दोन वर्षात, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक आरोग्य विम्याकडे लक्ष द्या (Medical Insurance) आरोग्य विमा हा कुटुंबासाठी मोठा आधार आहे. औषध आणि उपचारांचा वाढता खर्च केवळ आरोग्य विम्याच्या मदतीने भागवला जाऊ शकतो. विमा ही अशी योजना आहे ज्याचा फायदा तुमच्याकडे पैसे नसताना आणि तुम्हाला त्याची खूप गरज भासत असताना मिळतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Financial need, Investment, Money

    पुढील बातम्या