जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पवईतील बहुराष्ट्रीय बँक कर्मचाऱ्याचं लाजिरवाणं कृत्य! बँकेला थेट बोलवावे लागले पोलीस

पवईतील बहुराष्ट्रीय बँक कर्मचाऱ्याचं लाजिरवाणं कृत्य! बँकेला थेट बोलवावे लागले पोलीस

बँकेसोबत फ्रॉड

बँकेसोबत फ्रॉड

आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठी गुन्हेगार विविध प्रकारच्या शकला लढवतात. काही वेळा एसएमएसद्वारे तर काही वेळा बँकेच्या नावाचा वापर करून कॉलच्या माध्यमातून खातेदाराचे महत्त्वाचे पिन नंबर मिळवले जातात. आता तर काही बँक अधिकारीदेखील अशा घोटाळ्यांमध्ये सहभागी असल्याचं उघड झालं आहे. पवई पोलिसांनी नुकतीच असं एक प्रकरण समोर आणलं आहे. मजूर, कारखाना कामगार आणि कॉर्पोरेट कर्मचार्‍यांच्या केवायसी कागदपत्रांच्या आधारे शेकडो बनावट कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट तयार केल्याप्रकरणी एका बहुराष्ट्रीय बँकेतील सेल्स मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठी गुन्हेगार विविध प्रकारच्या शकला लढवतात. काही वेळा एसएमएसद्वारे तर काही वेळा बँकेच्या नावाचा वापर करून कॉलच्या माध्यमातून खातेदाराचे महत्त्वाचे पिन नंबर मिळवले जातात. आता तर काही बँक अधिकारीदेखील अशा घोटाळ्यांमध्ये सहभागी असल्याचं उघड झालं आहे. पवई पोलिसांनी नुकतीच असं एक प्रकरण समोर आणलं आहे. मजूर, कारखाना कामगार आणि कॉर्पोरेट कर्मचार्‍यांच्या केवायसी कागदपत्रांच्या आधारे शेकडो बनावट कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट तयार केल्याप्रकरणी एका बहुराष्ट्रीय बँकेतील सेल्स मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. त्यानं बिहार आणि इतर राज्यांतील घोटाळेबाजांना या खात्यांचे तपशील पाठवले आणि या घोटाळेबाजांनी सायबर फसवणूक करून मिळालेली रक्कम जमा करण्यासाठी या खात्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. अर्शद अत्तार (वय 27) असं अटक केलेल्या बँक अधिकाऱ्याचं नाव आहे. ‘मिड डे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मिळालेल्या माहितीनुसार, ही बनावट कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट उघडण्यासाठी वापरलेली कागदपत्रं कारखान्यातील मजूर आणि कर्मचाऱ्यांकडून केवायसीसाठी गोळा केलेली होती. या शिवाय, अटक करण्यात आलेला बँक अधिकारी स्वत: विविध कंपन्यांमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांचं सॅलरी अकाउंट उघडत असे. हे अकाउंट उघडल्यानंतर त्याच कागदपत्रांचा वापर करून आरोपी इतर कंपनींच्या नावाखाली एक बनावट अकाउंट सुरू करत असे आणि त्या अकाउंटचे तपशील घोटाळेबाजांना पाठवत असे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पवई पोलीस या वर्षी जानेवारी महिन्यात सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत असताना हा बनावट खात्यांचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान आरोपीनं एकूण 1 हजार 651 कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट्स उघडली आहेत. या पैकी किती खरी आणि बनावट आहेत हे शोधण्यासाठी अधिक तपास करणं गरजेचं आहे.

    Loan Recovery: लोन वसुलीसाठी रिकव्हरी एजेंट देऊ शकत नाही धमकी, काय आहेत तुमचे अधिकार?

    असा झाला खुलासा

    पवई येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय तरुणाला गॅस एजन्सीचा नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यानं एक वेबसाइट पाहिली आणि त्यावर आपली माहिती अपलोड केली. काही दिवसांनंतर त्याला एक ई-मेल आला आणि त्याची एजन्सीसाठी निवड झाल्याचं सांगण्यात आलं. सरकारी गॅस एजन्सीतील अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा त्याला फोन आला होता. त्यानं या तरुणाला आपले पॅन आणि आधार कार्ड तपशील वेबसाइटवर अपलोड करण्यास आणि प्रक्रिया शुल्क जमा करण्यास सांगितलं. या अधिकाऱ्यानं सांगितल्याप्रमाणे तरुणानं बँक खात्यामध्ये सुमारे 6.88 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपीनं विविध प्रक्रिया शुल्काच्या बहाण्याने आणखी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणानं जानेवारी महिन्यात पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. डीसीपी महेश्वर रेड्डी आणि उपनिरीक्षक सुधीर पिलाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बुधन सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकानं या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान त्यांना अशा एका बँक खात्याची माहिती मिळाली ज्या खात्याचं केवायसी आणि गुन्ह्यातील खात्याचं केवायसी अपडेशन एकाच व्यक्तीनं केलं होतं. केवायसी कागदपत्रं आणि स्वाक्षरीची पडताळणी या बहुराष्ट्रीय बँकेच्या पुणे शाखेतील अधिकाऱ्यानं केल्याचं पुढील तपासात आढळलं.

    ‘या’ सरकारी बँकेने वाढवले FD रेट्स! आता सर्वांनाच मिळतील जबरदस्त रिटर्न

    त्यानंतर पोलिसांचं एक पथक पुण्यात गेलं आणि बँकेतील सेल्स मॅनेजर असलेल्या अत्तारला अटक केली, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले. अत्तारला 31 मार्च रोजी मुंबईत आणून कोर्टात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, अत्तार कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट उघडत असे आणि बिहार व इतर राज्यांमधील घोटाळेबाजांना त्याचे तपशीप पाठवत असे. सायबर फसवणूक करून मिळालेली रक्कम जमा करण्यासाठी या खात्यांचा वापर होत असे. या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग आहे. आरोपींच्या शोधासाठी अनेक पथकं तयार करून अन्य राज्यांत पाठवण्यात आली आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात