मुंबई, 6 सप्टेंबर : एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त एटीएम कार्ड असणे आता सामान्य झाले आहे. पण या एटीएम कार्डवर ग्राहकांना पाच लाखांपर्यंतचा मोफत अपघात विमा मिळतो हे फार कमी लोकांना माहित असेल. माहितीच्या अभावामुळे बरेच लोक त्यावर दावाही करत नाहीत. बँका देखील सहसा ही माहिती ग्राहकांना देत नाहीत. थोडीशी सक्रियता दाखवल्यास हा विमा अडचणीच्या वेळी उपयोगी पडू शकतो. ही सुविधा जवळपास सर्व एटीएम कार्डवर उपलब्ध आहे. तुम्हाला पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण आहे. हा विमा काढण्यासाठी बँकांचे काही नियम आहेत. त्या एटीएम कार्डने महिन्यातून दोनदा व्यवहार करणे, बँक खात्यासाठी नॉमिनी असणे असे नियम आहेत. बँक जेव्हा तुम्हाला एटीएम कार्ड देते तेव्हा ते एटीएम कार्ड अपघात विमा आणि जीवन विमा देखील देते.
लोन अॅपचा ट्रॅप! सुलभ कर्जाच्या दलदलीतून कसं बाहेर पडावं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन करेल कर्जमुक्त
जर एखादी व्यक्ती कोणत्याही राष्ट्रीयकृत आणि बिगर राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम किमान 45 दिवस वापरत असेल, तर तो एटीएम कार्डसोबत येणाऱ्या विम्याचा क्लेम करण्यास पात्र आहे. बँका ग्राहकांना विविध प्रकारचे एटीएम कार्ड देतात. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम निश्चित केली जाते. ग्राहकांना क्लासिक एटीएम कार्डवर 1 लाख रुपये, प्लॅटिनम डेबिट कार्डवर 2 लाख रुपये, नॉर्मल मास्टर डेबिट कार्डवर 50,000 आणि प्लॅटिनम मास्टर डेबिट कार्डवर 5 लाखांचे विमा संरक्षण मिळते. प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ग्राहकांना रुपे कार्ड प्रदान केले जाते. कार्डधारकांना रुपे कार्डवर 1 ते 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
Post Office NSC: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; फक्त 5 वर्षात 10 लाखांचे होतील 14 लाख रुपये
जर एटीएम कार्डधारकाचा अपघातात मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला तर तो स्वत: किंवा नॉमिनी विम्यासाठी क्लेम करू शकतो. कार्डधारकाला अपंगत्वासाठी 50,000 रुपयांचे संरक्षण मिळेल. जर ग्राहक दोन्ही हाताने किंवा दोन्ही पायांनी अपंग झाला तर 1 लाखाचे विमा संरक्षण मिळू शकते. कशी असेल प्रोसेस? कार्डधारकाच्या नॉमिनीला अपघाताच्या क्लेमसाठी कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडे अर्ज करावा लागतो. अपघाताची एफआयआर प्रत, रुग्णालयातील उपचार कागदपत्रे आदी कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या नॉमिनीला मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआरची प्रत आणि इतर कागदपत्रे बँकेत सादर करावी लागतात. यानंतर बँक तपासणी करुन विम्याची रक्कम देते.