मुंबई, 17 जानेवारी: भारत केवळ 5 टक्के आयफोनचे उत्पादन करतो, परंतु 2027 पर्यंत ते भारत जगातील प्रत्येक 2 पैकी 1 आयफोन तयार करेल. तैवानच्या एका विश्लेषकाने हा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी जेपी मॉर्गनने म्हटले होते की, 2025 पर्यंत जगातील एकूण अॅपल आयफोनपैकी 25 टक्के आयफोन भारतात असेंबल केले जातील.
तैवानचे विश्लेषक ल्यूक लिन यांनी साउथ मॉर्निंग पोस्टमध्ये हा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सध्या भारत केवळ 5 टक्के आयफोनचे उत्पादन करत आहे. मात्र 2027 पर्यंत येथे जगातील जवळपास 50 % आयफोन तयार केले जाण्याची शक्यता आहे.
पगार 50 हजार असल्यास जुना Tax slab बेस्ट की नवा? घ्या जाणून
सध्या अॅपल मुख्यत्वे चीन आणि तैवानसारख्या देशांमध्ये आयफोन तयार करते. आता भारतातही मोठ्या स्तरावर याची तयारी सुरू आहे. फॉक्सकॉन पासून ते टाटा ग्रुप आयफोन बनवणार आहेत.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आयफोनच्या डिलिवरीमध्ये भारताची भागीदारी झपाट्याने वाडत आहे. एप्रिलपासून ते डिसेंबर 2022 च्या दरम्यान भारतातून आयफोनची शिपमेंट दुप्पट झाली आहे. या वृत्तावरुन संकेत मिळत आहेत की, अॅपल लवकरच चीन आणि भारतामध्ये आयफोन 15 सीरीजचे प्रोडक्शन सुरु करेल.
अॅपल आयफोनची जगात भयंकर क्रेझ आहे. लोक रात्रभर कंपनीच्या दुकानाबाहेर ते खरेदी करण्यासाठी उभे असतात. या फोनची टेक्नॉलॉजी, सिक्योरिटी, प्रायव्हसी आणि कॅमेरा क्वालिटीने लोकांना वेड लावले आहे. आता लवकरच हा आयफोन भारतात तयार केला जाईल.
Cash transaction rules : पैशांचा व्यवहार करताना कधी लागतो दंड? नेमका काय आहे नियम
चीनमध्ये कोरोना निर्बंधांमुळे अॅपलच्या प्रोडक्शनमध्ये विशेषतः आयफोनच्या उत्पादनामध्ये अडथळा आला होता. गेल्या नोव्हेंबर महिन्यात कोविड-19 मुळे झेंगझोउ येथील फोक्सकॉनचा सर्वात मोठा प्लांट बंद करण्यात आला होता. यामुळे अॅपलला हॉलिडे सीझनपूर्वी शिपमेंटमध्ये उशीर होईल अशी वॉर्निंग जारी करावी लागली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.