नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : पीएफ खातेधारक (PF Account-Holders)साठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation-EPFO) आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफवर निश्चित 8.5 टक्के व्याज एकरकमी देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मंनीकंट्रोलच्या अहवालानुसार बुधवारी ईपीएफओ संदर्भात निर्णय घेणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (सीबीटी) ने दोन हप्त्यांमध्ये व्याजाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी असा निर्णय घेतला होता की, आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफ वर निश्चित 8.50 टक्के दरापैकी 8.15 टक्के व्याजाची रक्कम आता मिळणार आणि उर्वरित 0.35 टक्के डिसेंबरमध्ये. या निर्णयामुळे ईपीएफओच्या जवळपास 6 कोटी सब्सक्रायबर्सवर परिणाम होणार आहे.
(हे वाचा-ही बँक देतेय स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, वाचा तुमचा कसा होईल फायदा)
सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, व्याजाची रक्कम हप्त्यामध्ये देण्याचा केवळ प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्रालयाने याबाबात त्यांची मतं मांडली की, ईपीएफओकडून व्याजाची रक्कम एकरमी देण्याबाबत पू्र्ण प्रयत्न केला जाणार आहे. कदाचित हप्त्याहप्त्याने ही व्याजाची रक्कम न मिळता एकरकमी मिळेल. यामुळे पीएफ खातेधारकांचा मोठा फायदा आहे.
व्याजाची रक्कम अशाप्रकारे देण्याचा मुद्दा ट्रस्टी बोर्डाच्या बुधवारच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी ठरलेला मुद्दा नव्हता. मात्र काही ट्रस्टीनी हा मुद्दा उचलून धरला. व्याजाची रक्कम देण्याबाबत होणारा उशीर याबाबत ही चर्चा झाली. केंदीय मंत्री संतोष गंगवार या ट्रस्टी बोर्डाचे अध्यक्ष आहेत. बोर्डाने यावर्षी मार्चमध्ये झालेल्या बैठकीत ईपीएफवर 2019-20 साठी 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. अर्थ मंत्रालयाने देखील या निर्णयाबाबत त्यांची सहमती दर्शवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.