मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF ट्रान्सफर करायचा आहे, पण UAN माहित नाही? काही मिनिटांत असा शोधा

PF ट्रान्सफर करायचा आहे, पण UAN माहित नाही? काही मिनिटांत असा शोधा

EPFO Latest News: कर्मचार्‍यांच्या पीएफ निधीचे व्यवस्थापन करणार्‍या EPFO ​​या संस्थेने अलीकडे अनेक बदल केले आहेत. यामुळे ईपीएफ खात्यातील शिल्लक तपासणे, पीएफ खाते हस्तांतरित करणे आणि पीएफ फंडातून पैसे काढणे देखील सोपे झाले आहे.

मुंबई, 14 फेब्रुवारी : नोकरी बदलल्यामुळे तुमचा पीएफ खातेक्रमांक बदलला आहे का? तुमच्या जुन्या पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम नवीन पीएफ खात्यात हस्तांतरित (PF Transfer) करायची आहे का? तर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत पीएफ खात्यातून बाहेर पडण्याची तारीख (Date of Exit) स्वतः भरू शकता. यासोबत तुम्ही पीएफ ((PF Transfer Online)) ट्रान्सफर करू शकता आणि क्लेमद्वारे (PF Claim Online) पैसेही काढू शकता. आहे की नाही सोपं? चला आता ही प्रक्रिया करायची कशी? हे जाणून घेऊया.

UAN नंबर माहिती असणे आवश्यक?

पीएफशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा UAN (Universal Account No) माहित असणे आवश्यक आहे. यासोबतच सक्रिय UAN असणे देखील आवश्यक आहे. परंतु जर तुम्हाला UAN माहित नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुमचा UAN जाणून घेऊ शकता.

UAN क्रमांक शोधण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप पद्धत जाणून घ्या (Step-by-Step Process to get UAN No)

तुमच्या मोबाईल किंवा संगणक ब्राउझरवर https://www.epfindia.gov.in/ उघडा.

आता Home च्या शेजारील Services वर क्लिक करा.

येथे तुम्हाला 'For Employees' हा पर्याय मिळेल.

'For Employees' यावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल.

येथे डाव्या बाजूला सर्विस सेक्सनमध्ये Member UAN/ Online Service (OCS/ OTCP) वर क्लिक करा.

यासोबत तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.

या पेजवर Important Links सेक्शन उजव्या बाजूला तळाशी आढळेल.

येथे दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला 'Know your UAN' चा पर्याय दिसेल.

PF Interest Rate : खूशखबर! यावर्षी EPF वर जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता

तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

या पेजवर 10 अंकी मोबाइल क्रमांक टाका.

कॅप्चा कोड एंटर करा आणि 'OTP विनंती' वर क्लिक करा.

यानंतर ओटीपी टाकण्यासाठी तुमच्या समोर एक रिकामी जागा येईल.

रिकाम्या जागेत OTP टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि नंतर सबमिट करा.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज येईल.

येथे आपले नाव टाका. त्यानंतर जन्मतारीख निवडा. यानंतर, आधार (Aadhaar No)/PAN आणि सदस्य आयडी वरून कोणताही एक क्रमांक प्रविष्ट करा.

कॅप्चा कोड टाकल्यानंतर Show My UAN वर क्लिक करा.

आता तुमच्या समोर UAN नंबर येईल.

या प्रक्रियेचे अनुसरण करण्यापूर्वी तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुमचा मोबाइल नंबर तुमच्या EPF Account शी जोडलेला असावा.

First published:

Tags: PF Amount, PF Withdrawal