Home /News /money /

नोकरदार वर्गासाठी खूशखबर! PF संदर्भात 5 मार्चला सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

नोकरदार वर्गासाठी खूशखबर! PF संदर्भात 5 मार्चला सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

नोकरदार वर्गासाठी आता एक खूशखबर आहे. EPFO च्या 6 कोटी सब्सक्रायबर्सना केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर दिलासा मिळणार आहे. 5 मार्च 2020ला याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

  वी दिल्ली, 1 मार्च : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या (EPFO- Employee Provident Fund Organization) नियमांमध्ये नोकरदार वर्गासाठी वेळोवेळी योजनांमध्ये बदल करण्यात येतो. नोकरदार वर्गासाठी आता एक खूशखबर आहे. EPFO च्या 6 कोटी सब्सक्रायबर्सना सरकारच्या या निर्णयानंतर दिलासा मिळणार आहे. PF डिपॉझिट्सवर मिळणारं व्याज 8.66 टक्के ठेवण्याचा विचार कामगार मंत्रालयाकडून (Mininstry of Labour) करण्यात येत आहे. पीटीआय न्यूज एजन्सीला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. यामुळे पीएफ धारकांना मोठा फायदा मिळणार आहे. CBT च्या बैठकीत होऊ शकतो निर्णय या आठवड्यात EPFO बाबत निर्णय घेणारी संस्था ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ (CBT) बैठक घेणार आहे. या बैठकीत EPF डिपॉझिट्सवर मिळणाऱ्या व्याजाबाबत चर्चा केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये EPF वर 8.65 टक्के व्याज ठेवण्यात येईल. मंत्रालय सुद्धा या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. यापूर्वी अशी शक्यता वर्तवण्यात आली होती की, EPF डिपाझिट्सवर मिळणारं व्याज घटवण्यात येणार आहे. काही अहवालांनुसार 8.65 असणारा व्याजदर कमी करून 8.50 करण्यात येणार होता. सूत्रांच्या माहितीनुसार, 5 मार्चला CBT जी बैठक पार पडणार आहे, त्याचा अजेंडा अद्याप निश्चित नाही आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी EPFO मधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाबाबत अनुमान लावणं कठिण आहे.

  (हे वाचा-शेतकरी संघटनांना मोदी सरकार देणार 15 लाख, बळीराजासाठी FPO ठरणार फायद्याचं)

  याआधी EPFO कडून पेन्शनधारकांसाठी योजनांमध्ये बदल केला होता. पूर्ण मासिक पेन्शन देण्याच्या प्रस्तावाला EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची 21 ऑगस्ट 2019 ला हिरवा कंदिल दिला होता.या सुविधेनुसार, पेन्शनधारकाला पेन्शनच्या आगाऊ रकमेची काही भाग एकरकमी दिला जातो.कर्मचारी पेन्शन स्कीम म्हणजेच EPS च्या नियमांनुसार 26 सप्टेंबर  2008 च्या आधी रिटायर झालेले EPFO सदस्य त्यांच्या पेन्शनच्या एकतृतियांश रक्कम एकरकमी मिळवू शकतात. उरलेली दोन तृतियांश पेन्शन त्यांच्या आयुष्यभर मासिक पेन्शनच्या रूपात मिळत राहील. याआधी 15 वर्षांनंतर पूर्ण पेन्शन देण्याची तरतूद होती. ही तरतूद सरकारने 2009 मध्ये रद्द केली. आता मात्र पुन्हा एकदा या निर्णयाची अमलजावणी करण्यात येईल. जर कुणी 1 एप्रिल 2005 ला निवृत्त झालं तर त्या कर्मचाऱ्याला 1 एप्रिल 2020 ला म्हणजे 15 वर्षांनी पेन्शनची रक्कम मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या