नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा होणारी रक्कम ही तुमच्या मेहनतीची कमाई असते आणि भविष्यासाठी केलेली तरतुद असते. अशावेळी ही रक्कम सुरक्षित आहे की नाही याबाबत खात्री बाळगणं आवश्यक आहे. पीएफ संदर्भात ईपीएफओ (EPFO) ने एक महत्त्वाचा अलर्ट (EPFO Alert) जारी केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employee Provident Fund Organization) त्यांच्या 6 कोटी सदस्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तुम्ही सावधानता बाळगली नाही तर तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरं जावू लागू शकतं. खातेधारकांनी अकाउंट (PF Account Alert) सुरक्षित ठेवावं याकरता ईपीएफओने महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खातेधारकांना पीएफ अकाउंट आणि संबंधित वैयक्तिक मिहिती कुणासह शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने असं म्हटलं आहे की ईपीएफओ कडून कोणतीही वैयक्तिक माहिती जसं की, आधार, UAN, PAN, बँक खाते इ. माहिती फोन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारली जात नाही, किंवा कोणतीही रक्कम बँक खात्यात डिपॉझिट करण्यासही सांगितले जात नाही. ईपीएफओने ट्वीट करत या प्रकारच्या फ्रॉडबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे.
#EPFO never asks it's members to share their personal details. Stay alert & beware of fraudsters.#SocialSecurity #PF #ईपीएफ #Employees #Services pic.twitter.com/FOul1jSNnf
— EPFO (@socialepfo) September 6, 2021
ईपीएफओकडून वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना सावध केले जाते, जेणेकरून कोणत्याही फसवणुकीची ते शिकार होणार नाहीत. ज्या App चा स्रोत माहित नसेल असे App डाऊनलोड करू नये असा सल्ला देखील सदस्यांना देण्यात आला आहे. शिवाय EPFO ने बनावट कॉल्सपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओचे अधिकारी सांगून हे भामटे ग्राहकांची वैयक्तिक माहिती विचारून फसवणूक करतात. त्यामुळे ग्राहकांना सावध करण्यासाठी ईपीएफओने ट्वीट करत म्हटले आहे की ईपीएफओकडून कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती विचारली जात नाही. ईपीएफओने सब्सक्रायबर्सना फेक वेबसाइटपासून वाचण्याचा देखील सल्ला दिला आहे.