मुंबई : ट्विटर ची मालकी एलन मस्क यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यामधील एक तर 50 टक्के कर्मचारी काढण्याचा होता. त्यांनी एक झटक्यात 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. जवळपास 50 टक्के स्टाफ कमी केला. याशिवाय 12 तासांची ड्युटी आणि 7 दिवस काम करण्याच्या सूचनाही दिल्या. ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी कर्मचारी काढल्याच्या बातमीवर शिक्कमोर्तब केला आहे. जेव्हा कंपनीला दररोज 4 दशलक्ष डॉलर्स (32 कोटींपेक्षा जास्त) तोटा सहन करावा लागत आहे, तेव्हा दुर्दैवाने इतर कोणतेही पर्याय माझ्याकडे उरत नाही असं त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे." Twitter चं Blue Tick आता नाही मिळणार फुकट; मोजावी लागणार एवढी मोठी रक्कम
Regarding Twitter’s reduction in force, unfortunately there is no choice when the company is losing over $4M/day.
— Elon Musk (@elonmusk) November 4, 2022
Everyone exited was offered 3 months of severance, which is 50% more than legally required.
रिपोर्ट्सनुसार, मस्क यांनी भारतातील संपूर्ण मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीमला काढून टाकले आहे. तर इंजिनिअरिंग, सेल्स आणि पार्टनरशिप टीमवरही परिणाम झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 टक्के कर्मचारी काढण्यात आले आहेत. मात्र किती कर्मचारी काढले याबाबत अजून ट्विटर किंवा एलन मस्क यांनी अधिकृत आकड्यावर शिक्कमोर्तब केलं नाही. 12 तास आणि आठवड्याचे 7 दिवस काम, ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी नव्या बॉसनं कडक केले नियम मस्क यांनी नुकतीच व्हेरिफाइड अकाउंट्स/ब्लू टिकसाठी महिन्याला 660 रुपये द्यावे लागणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी आणि मायक्रोब्लॉगिंग साईटचे बनावट व्हेरिफाइड अकाउंट्सपासून संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचं असल्याचा दावा मस्क यांनी केला. ट्विटरवर ‘ब्लू टिक’साठी पैसे द्यावे लागल्यास वापरकर्त्यांसाठी Koo ठरेल का नवं ‘घरटं’? काय सांगतात तज्ज्ञ?
जर व्हेरिफाइड अकाउंट हवं असेल तर 8 डॉलर भरू शकतो त्यामुळे मला त्याचं दु:ख नाही ते कोणालाही भरणं अगदी सहज शक्य असल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं. त्यावरू सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.