मुंबई: महागाईचा मोठा फटका आता खिशाला देखील बसणार आहे. एकीकडे गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे भाज्यांच्या किंमती देखील आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. आता महावितरणचा शॉक देखील जोरदार मिळणार आहे. महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात अदानी पावर आणि जीएमआर, वरोरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Sangli news: ऐन हंगामात कोसळली द्राक्षबाग, अस्मानी संकटाचा शेतकऱ्याला फटका!न्यायालयाने महावितरणला हजारो कोटींचा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनी वीज दरात आणखी वाढ करून या दंडाची भरपाई ग्राहकांकडूनच करील. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ होईल, हे निश्चित आहे. उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. उष्णता आताच वाढायला लागली आहे. त्यामुळे एसी, कुलर आणि पंख्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला या उन्हाळ्यात जास्त विजबिल भरावं लागण्याची शक्यता आहे. तुमचं बजेट देखील कोलमडू शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा खिशाला कात्री लागणार असेच सध्यातरी चित्र आहे.