मराठी बातम्या /बातम्या /मनी /‘ही’ बँक देतेय सर्वांत स्वस्त एज्युकेशन लोन, जाणून घ्या सविस्तर

‘ही’ बँक देतेय सर्वांत स्वस्त एज्युकेशन लोन, जाणून घ्या सविस्तर

शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत? या बँका देतायत स्वस्त लोनचा पर्याय

शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत? या बँका देतायत स्वस्त लोनचा पर्याय

कर्ज घेणाऱ्याने सोईनुसार कुठून लोन घ्यायचं हे ठरवावं. लोन घेताना स्वस्त लोन घेण्याकडेच बहुतेकांचा कल असतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखादा विद्यार्थी खूप हुशार असेल आणि त्याला परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल पण पैसे नसतील तर त्याला जाता येत नाही. अशा अडचणीत कुणाकडून उसने पैसे घ्यावे लागतात किंवा बँकेकडून शैक्षणिक कर्ज काढावं लागतं.

    इंटरनॅशनल बँक, सरकारी बँक, प्रायव्हेट बँक आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या शैक्षणिक लोन देतात. कर्ज घेणाऱ्याने सोईनुसार कुठून लोन घ्यायचं हे ठरवावं. लोन घेताना स्वस्त लोन घेण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. कारण लोन स्वस्त असेल तर व्याजही कमी भरावं लागतं.

    लोन घेताना प्रोसेसिंग फी, लोन मिळवण्याची पात्रता या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. कोणती बँक कोणत्या दराने कर्ज देते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा त्या बँकेच्या शाखेत जाऊन माहिती मिळवू शकता. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया 7.95 ते 11.15 टक्के, बँक ऑफ बडोदा 8.45 ते 10.75 टक्के आणि पंजाब नॅशनल बँक 8.65 ते 11.40 टक्के दराने एज्युकेशन लोन देत आहे.

    3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज कुठं मिळेल? वाचा टॉप बँकांची यादी

    1) स्टेट बँक ऑफ इंडिया

    भारतीय स्टेट बँक सर्वांत स्वस्त एज्युकेशन लोन देत आहे. या बँकेचे व्याज दर 7.95 टक्के ते 11.15 टक्के आहेत. एसबीआय विद्यार्थ्यांना 50 लाख रुपयांपर्यंत लोन देते. 20 लाख रुपयांपर्यंत लोन घेतल्यास त्यावर कोणतीही प्रोसेसिंग फी लागणार नाही. 20 लाखांपेक्षा जास्त लोनवर 10,000 रुपये प्रोसेसिंग फी आहे. स्कॉलर लोनसाठी प्रोसेसिंग फी नाही. तसेच 4 लाख रुपयांपर्यंतच्या लोनवर कोणतंही मार्जिन नाही आणि 4 लाखांपेक्षा जास्त लोनवर 5 टक्के मार्जिन आहे. एसबीआयच्या 7.5 लाख रुपयांच्या एज्युकेशन लोनवर कोणतीही सिक्युरिटी म्हणजे तारण ठेवावं लागत नाही, त्याच्यापेक्षा जास्त लोनसाठी सिक्युरिटी द्यावी लागेल.

    डेबिट कार्डशिवाय करा ऑनलाईन पेमेंट, अवघ्या काही सेकंदात होईल काम

    2) पंजाब नॅशनल बँक

    पंजाब नॅशनल बँकेच्या एज्युकेशन लोनचा व्याजदर 8.65 ते 11.40 टक्के आहे. कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. कर्ज म्हणून कितीही पैसे घेता येतात. कर्जाच्या 1% रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून भरावी लागेल. 4 लाखांपर्यंतच्या कर्जावर कोणतंही मार्जिन नाही, परंतु 4 लाखांपेक्षा जास्त कर्जावर 5 टक्के मार्जिन आहे. 7.5 लाखांपर्यंतच्या कर्जावर कोणतीही सिक्युरिटी नाही. त्यापेक्षा जास्त कर्ज घ्यायचं असेल तर सिक्युरिटी द्यावी लागेल.

    3) बँक ऑफ बडोदा

    बँक ऑफ बडोदा 8.45 टक्के ते 10.75 टक्के दराने एज्युकेशन लोन देत आहे. ही बँक ग्राहकांना 1.25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. 7.5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी नाही. तर यापेक्षा जास्त लोनसाठी 1% फी द्यावी लागेल. जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल. 4 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मार्जिन शून्य आहे, तर तुम्ही त्यापेक्षा जास्त लोन घेतल्यास तुम्हाला 5% मार्जिन भरावे लागेल. 4 लाखांपर्यंतच्या कर्जावर कोणतीही सिक्युरिटी नाही. 4 लाख ते 7.5 लाखपर्यंत कर्जावर थर्ड पार्टी गॅरंटी पाहिजे. 7.5 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी त्या रकमेच्या एक चतुर्थांश रक्कम सिक्युरिटी म्हणून जमा करावी लागेल.

    First published:

    Tags: Bank Of Maharashtra, Money, Pnb, Pnb bank, SBI, Sbi account, State bank of india