मुंबई : एकीकडे महागाई वाढत आहे. सणासुदीला CNG चे दर वाढले आहेत, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. दसरा-दिवाळीपर्यंत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या फराळाचा आनंद द्विगुणीत होण्याची शक्यता आहे. येत्या काळात खाद्य तेलाच्या किंमती आणि सोन्या-चांदीचे दर खाली येण्याची शक्यता आहे. सरकारने यावरील मूळ आयातीच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील किमतींमध्ये सुधारणा झाली आहे त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारने निवेदनात म्हटलं आहे. भारत सरकारने शुक्रवारी रात्री एक निवेदन जारी केलं. या निवेदनानुसार कच्चा पाम तेलाच्या किंमतीची मूळ आयात किंमत 996 डॉलर प्रती टन वरून 937 डॉलर करण्यात आली आहे. त्यामुळे आता खाद्य तेलाच्या किंमती स्वस्त होतील असा कयास आहे.
सणासुदीला पुणेकरांना धक्का, CNG च्या दरात मोठी वाढRBD पाम तेलाची आधारभूत किंमत 1,019 डॉलरवरून 982 डॉलर प्रति टन, RBD पामोलिनची किंमत 1,035 डॉलरवरून 998 डॉलर प्रति टन, कच्च्या सोयाबीन तेलाची आधारभूत किंमत 1,362 डॉलरवरून 1,257 डॉलर प्रति टन इतकी कमी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर घसरल्याने त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत खाद्यतेल आणि सोन्याचे दर खाली उतरतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.