मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सणासुदीला पुणेकरांना धक्का, CNG च्या दरात मोठी वाढ

सणासुदीला पुणेकरांना धक्का, CNG च्या दरात मोठी वाढ

 पुण्यात CNG च्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा आणि कारने फिरणं म्हणजे खिसा रिकामा करण्यासारखं होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Kranti Kanetkar

पुणे : सणासुदीमध्ये आधीच महागाई वाढली आहे. इंधनाचे दर कडाडले आहेत तर दुसरीकडे RBI ने व्याजदरात वाढ केल्याने EMI आणि कर्ज वाढले आहेत. त्यापाठोपाठ आणखी एक धक्का मिळाला आहे. पुण्यात CNG च्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा आणि कारने फिरणं म्हणजे खिसा रिकामा करण्यासारखं होणार आहे.

CNG च्या दरात पुन्हा एकदा 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता प्रती लिटर CNG साठी पुणेकरांना 91 रुपये मोजावे लागणार आहेत. आजपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ झाल्याने नागरिकांना धक्का मिळाला आहे.

Petrol Diesel Prices: कुठे स्वस्त तर कुठे महाग झालं पेट्रोल-डिझेल, आताच चेक करा तुमच्या शहरातील दर

दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीचे दर मुंबईत अनेक ठिकाणी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर सणासुदीच्या काळात मुंबई-पुण्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

दुसरीकडे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे इंधनाचे दर गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत.

First published: