• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Easy Home Loan: मोठं घर घेण्याचं स्वप्न करा पूर्ण! अशाप्रकारे भरा डाऊन पेमेंट आणि EMI

Easy Home Loan: मोठं घर घेण्याचं स्वप्न करा पूर्ण! अशाप्रकारे भरा डाऊन पेमेंट आणि EMI

सध्या कोरोना साथीमुळं (Corona Pandemic) बहुतांश लोक घरातून काम करत (Work from Home) असल्यानं काहीवेळा घर लहान असल्यास अडचणी येत आहेत. त्यामुळं 25 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचा अर्थात मिलेनियल्सचा कल मोठं घर (Big House) घेण्याकडं वाढला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 01 जुलै: सध्या कोरोना साथीमुळं (Corona Pandemic) बहुतांश लोक घरातून काम करत (Work from Home) असल्यानं काहीवेळा घर लहान असल्यास अडचणी येत आहेत. त्यामुळं 25 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचा अर्थात मिलेनियल्सचा कल मोठं घर (Big House) घेण्याकडं वाढला आहे. या ग्राहकावर्गांकडून येणारी मोठ्या घराची मागणी पूर्ण करण्यासाठी लोन टू व्हॅल्यू (LTV-एलटीव्ही) व्यवस्थापन करून डाउनपेमेंट कमी करण्याचा एक नवीन ट्रेंड जोर पकडत आहे. रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म नो ब्रोकरच्या (NoBroker.com) नव्या सर्वेक्षणानुसार अनेक कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करू देण्याची पद्धत रूढ झाली असून, कंपन्यांनी हायब्रिड मॉडेल स्वीकारलं आहे. त्यामुळं हजारो लोक स्वस्त व्याज दर (Low Interest Rate) आणि दीर्घ मुदतीचं कर्ज (Long Term Loan) घेऊन मोठी घरं खरेदी करत आहेत. यासाठी अधिक एलटीव्ही (LTV) ठेवला जात आहे. नो ब्रोकरनं 1200 हून अधिक ग्राहकांचे सर्वेक्षण करून हा निष्कर्ष नोंदवला आहे. 31 टक्के लोकांना 15 वर्षाचे गृह कर्ज हवे आहे या सर्वेक्षणानुसार, 31 टक्के लोकांनी 10-15 वर्षांच्या गृहकर्जांना पसंती दिली आहे. दीर्घ कालावधीमुळे उत्तम एलटीव्ही (LTV) उपलब्ध होत आहे. त्यामुळं अगदी कमी डाउनपेमेंटमध्ये (Down Payment) मोठे घर विकत घेणं शक्य झालं आहे. त्याच वेळी 24 टक्के लोकांनी 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीला प्राधान्य दिलं आहे. यातील सुमारे 65 टक्के लोक आयटी क्षेत्रात आहेत तर उर्वरित एकतर व्यावसायिक किंवा सरकारी सेवांमध्ये आहेत. हे वाचा-Bank Privatisation: मोठी बातमी! या बँका होणार खाजगी, पावसाळी अधिवेशनात निर्णय एलटीव्हीवरून कशी ठरते गृह कर्जाची रक्कम गृहकर्जाची रक्कम ठरवताना बँक लोन टू व्हॅल्यु अर्थात एलटीव्ही आणि कर्ज निवारण शुल्क हे महत्वाचे घटक विचारात घेते. एलटीव्ही म्हणजे खरेदी करत असलेल्या मालमत्तेच्या एकूण मूल्यावर मिळणारी जास्तीत जास्त कर्ज रक्कम. एलटीव्ही जितकी जास्त तितके डाउन पेमेंट कमी होते. यामुळं तुम्ही जास्त किमतीचे घर घेऊ शकता. कमी डाउनपेमेंटमुळे कर्जाचा मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय (EMI) वाढतो; पण कर्जपरतफेडीचा कालावधी वाढवून तो कमी करता येतो. घर खरेदीदारांची संख्या 49टक्क्यांवरून 63 टक्क्यांपर्यंत वाढली सर्वेक्षणानुसार, आता घर खरेदी करणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या 49 टक्क्यांवरून वाढून 63 टक्के झाली आहे. नोब्रोकरवरील डेटानुसार, 2020 च्या तुलनेत 2021 च्या पहिल्या तिमाहीत गृहविक्रीत चांगली वाढ झालेली दिसून येत आहे. बंगळुरू आणि चेन्नईत गृहविक्रीत अनुक्रमे 41 आणि 47 टक्के वाढ झाली आहे, तर हैदराबादमध्ये 52 टक्के वाढ झाली आहे. मुंबई आणि पुणे इथं अनुक्रमे 86 आणि 83 टक्के वाढ झाली असून ही शहरं गृहविक्रीत आघाडीवर आहेत. दिल्ली-एनसीआरमध्येदेखील 34 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. हे वाचा-केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाख रुपये, तुम्हाला देखील करता येईल अर्ज एलटीव्हीमुळे मोठ्या घरांना मागणी NoBroker.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक अमित अग्रवाल यांच्या मते, ‘घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींचे सरासरी वय आता कमी आहे. पहिलं घर घेणाऱ्या ग्राहकांचे वय आता 25 ते 45 वर्षे असते. ते एलटीव्हीला अधिक प्राधान्य देत असल्यानं ते मोठं घर खरेदी करण्याला पसंती देतात. त्यामुळं मिलेनियल्ससाठी कर्ज देणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्था निवडताना व्याज दराखेरीज उत्तम एलटीव्ही हा महत्त्वाचा घटक ठरत आहे.
First published: