जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्याकडे आहे 123456 या अंकाची कोणतीही नोट? अशाप्रकारे मिळतील 1-5 लाख रुपये; वाचा सविस्तर

तुमच्याकडे आहे 123456 या अंकाची कोणतीही नोट? अशाप्रकारे मिळतील 1-5 लाख रुपये; वाचा सविस्तर

तुमच्याकडे आहे 123456 या अंकाची कोणतीही नोट? अशाप्रकारे मिळतील 1-5 लाख रुपये; वाचा सविस्तर

तुम्हाला जुनी नाणी-नोटा जमवण्याचा छंद (Currency Collection) असेल तर हा छंद तुम्हाला सध्या फायद्याचा ठरू शकतो. कारण तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा किंवा नाणी विकून तुम्ही पैसे कमावू (earn money from home) शकता. काही खास नोटांची ऑनलाइन विक्री (Online Auction)केली जाते आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जुलै: तुम्हाला जुनी नाणी-नोटा जमवण्याचा छंद (Currency Collection) असेल तर हा छंद तुम्हाला सध्या फायद्याचा ठरू शकतो. कारण तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा किंवा नाणी विकून तुम्ही पैसे कमावू (earn money from home) शकता. काही नोटा किंवा नाणी चलनातून रद्द झाल्या आहेत, तर काहींवर असणारा नंबर विशिष्ट प्रकारचा आहे. या खास नोटांची ऑनलाइन विक्री (Online Auction) केली जाते आहे. तुम्ही घरबसल्या यातून चांगली कमाई करू शकता. आजकाल काही वेबसाइट्स अँटिक नाणी आणि नोटांचा लिलाव करतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही नोटांसंदर्भात सांगणार आहोत. तुमच्याकडे अशी खास नोट असेल तर तुम्ही तिचा लिलाव करू शकता. याकरता तुमच्याकडे 1, 2, 10, 100, 500, 2000, 200 यापैकी कोणतीही नोट असेल तरी चालेल, मात्र त्यामध्ये एख खासियत असणं आवश्यक आहे. हे वाचा- Gold Price Today: आज खरेदी करता येईल 7921 रुपयांनी स्वस्त सोनं,तपासा लेटेस्ट दर काय आहे या नोटेतील खास बाब? तुमच्याकडे नोटांचं कलेक्शन असेल तर त्यात तपासा की 123456 अंक असणारी कोणती नोट तुमच्याकडे आहे का. अशी नोट असेल तर तुम्ही ती ई-बे (Ebay) वेबसाइट जाऊन तिचा ऑनलाइन लिलाव करू शकता. भारतीय चलनातील दूर्मिळ नोटांचा ई-बेवर लिलाव केला जातो. यामधून तुम्ही देखील कमाई करू शकता. कुठे कराल विक्री? 123456 नंबर असणारी नोट तुम्ही घरबसल्या विकू शकता. ईबे इंडिया किंवा क्लिक इंडिया (Click India) सारख्या वेबसाइट या नोटांचा लिलाव करतात. क्लिक इंडिया साइटवर तर WhatsApp वरुन थेट विक्रीची लिंक देण्यात आली आहे. या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 1 लाख ते 5 लाख रुपये मिळू शकतात.

News18

ऑनलाइन विक्रीसाठी तुम्हाला 123456 अंक असणाऱ्या नोटेचा फोटो काढावा लागेल. त्यानंतर बोली लावणाऱ्या साइटवर तुम्हाला विक्रीकर्ता म्हणून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला काढलेला नोटेचा फोटो साइटवर पोस्ट करावा लागेल. त्यानंतर ज्यांना खरेदी करायची आहे ते तुम्हाला संपर्क करतील. तुम्ही तुम्हाला आवश्यक त्या किंमतीनुसार ही नोट विकू शकता. (डिस्क्लेमर- ही बातमी वेबसाइट्सवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आली आहे, News18 लोकमतकडून याबाबत पुष्टी करण्यात येत नाही आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात