मुंबई: राज्यातील गोरगरीब जनतेची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. शिंदे- फडणवीस सरकार यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दारिद्रय़रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना नाममात्र दरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल आदी वस्तू देण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दारिद्रयरेषेखालील तब्बल एक कोटी ६२ लाख ४२ हजार रेशन कार्डहोल्डर्सना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिलं जाणार आहे. जाण्याची शक्यता आहे. त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. घरगुती गॅसपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. अशा परिस्थितमध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची आणि गरजूंची दिवाळी गोडाधोडाची व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कमी दरात रवा, चणाडाळ, साखर यासारख्या वस्तू आणि पामतेल कमी दरात मिळत असल्याने आता गोरगरीबांनाही दिवाळी साजरी करणं शक्य होणार आहे. त्यांना नव्या सरकारनं हे दिवाळीआधी खास गिफ्ट दिलं आहे.