मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दिवाळीच्या दिवसांत टाळा 5 चुका, अन्यथा लायसन रद्द होऊ शकतं

दिवाळीच्या दिवसांत टाळा 5 चुका, अन्यथा लायसन रद्द होऊ शकतं

दिवाळीच्या  दिवसांमध्ये तुम्ही रस्त्यावरून जर काळीपूर्वक गाडी चालवली नाही मोठा फटका बसू शकतो.

दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही रस्त्यावरून जर काळीपूर्वक गाडी चालवली नाही मोठा फटका बसू शकतो.

दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही रस्त्यावरून जर काळीपूर्वक गाडी चालवली नाही मोठा फटका बसू शकतो.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : सण-उत्सव म्हटलं की आपण मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे येणं-जाणं होतं. याशिवाय कामानिमित्त, खरेदीसाठी बाहेर पडत असतो. अशावेळी गडबड असल्यानं बऱ्याचवेळा वाहतुकीच्या नियम मोडले जातात. पण यंदाच्या दिवाळीत अशी चुक करणं पुरतं महागात पडू शकतं. सणासुदीच्या काळात धोकादायक वाहन चालवणे किंवा वाहतुकीचे नियम मोडणे आपणास महागात पडू शकते. 13 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि 14 नोव्हेंबरला दिवाळीच्या  दिवसांमध्ये तुम्ही रस्त्यावरून जर काळीपूर्वक गाडी चालवली नाही मोठा फटका बसू शकतो.

नवीन मोटर वाहन दुरुस्ती कायदा 2019 मागील वर्षी सप्टेंबरपासून देशात लागू आहे. याची अंमलबजावणी आता एका वर्षापेक्षा अधिक झाली आहे. नवीन मोटार वाहन अधिनियम 2019, पेनल्टी, चालानच्या नियमांबाबत बरेच बदल करण्यात आले आहेत. नव्या सुधारित विधेयकात रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस तरतूद करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी दंड आकारण्यात येईल. यासह आरसी (आरसी) आणि मोटर विमा विथ ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) यासारख्या नियमांतही मोठे बदल करण्यात आले आहेत.

हे वाचा-160 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळवा 23 लाख, वाचा LIC ची नवी पॉलिसी

एक छोटी चूक देखील आपलं लायसन्स रद्द करू शकते. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणं महत्त्वाचं आहे. सिग्नल असो किंवा हेल्मेट किंवा गाडीचे कागदपत्र सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. इतकच नाही तर स्टंट करून गाडी चालवणे किंवा दारू पिऊन गाडी चालवल्यास दंड आकारला जाणार आहे.

आपलं ड्रायव्हिंग लायसन्स संपलं असेल तर किंवा ते सोबत नसेल तर हेल्मेट नसेल तरी देखील आपल्याला मोठा दंड होऊ शकतो. वाहतूक पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करणे, कार न थांबविणे, ट्रकच्या केबिनमध्ये बसणे अशा गैरवर्तवणुकीसाठी देखील आपलं लायसन्स रद्द होऊ शकतं.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या नवीन नियमांनुसार, बस, टॅक्सीमध्ये जादा बसणे, राइडमध्ये गैरवर्तन करणे, थांबत न येणे, बस चालविताना धुम्रपान करणे, मद्यपान करणे, विनाकारण वाहन चालविणे, बस चालकाने सिगारेट अथवा मद्यपान करून बस चालवल्यास महागात पडू शकतं. अशा कारणांसाठी दंड आणि लायसन रद्द केल जाऊ शकतं

First published:

Tags: Diwali 2020, Money, Traffic Rules