जाहिरात
मराठी बातम्या / मनी / असा करा तुमच्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा , जाणून घ्या डीमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

असा करा तुमच्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा , जाणून घ्या डीमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

असा करा तुमच्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा , जाणून घ्या डीमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

तुम्ही जर गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल तर आजपासून नक्की करा, त्यासाठी तुम्हाला एक छोटं काम करायचं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने डिमॅट अकाउंट ओपन करावयाचे असल्यास तुम्ही angel one, upstox pro, Zerodha किंवा grow, five paisa या ब्रोकर कडे तुम्ही तुमचे डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. डीमॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सर्वप्रथम तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर आणि ईमेल लिंक असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा: खालीलपैकी एक मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराची फोटो (Passport size Photo) PAN कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन परवाना पत्त्याचा पुरावा: खालीलपैकी एक रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स पावती, पासपोर्ट, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड उत्पन्नाचा पुरावा: प्राप्तिकर रिटर्नची (ITR) फोटोकॉपी, अलीकडील सॅलरी स्लिप, वर्तमान बँकचे बँक अकाउंट स्टेटमेंट किंवा रद्द केलेला वैयक्तिकृत चेक. डिमॅट अकाउंट निवडताना विचारात घेण्याचे घटक सुलभ प्रक्रिया डिमॅट अकाउंट तयार करतेवेळी सेवा प्रदात्यांसाठी संपूर्ण प्रक्रिया सेबीने अनिवार्य केली आहे त्यामुळे तुम्ही तुमचा आधार नंबर वापरून, e-KYC प्रक्रियेद्वारे डिमॅट अकाउंट उघडू शकता. ई-केवायसीद्वारे, ग्राहकांना केवळ व्हिडिओ कॅमेरा किंवा सेल्फीद्वारे अंतिम स्वयं-ओळख प्रदान करणे आवश्यक आहे. हे वाचा-Mutual Funds : डिमॅट अकाउंट म्हणजे काय? त्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? अकाउंट उघडण्याचे शुल्क Demat Account उघडण्यासाठी ३०० ते ७०० रुपये लागू शकतात. सध्या काही ब्रोकर्स फ्री मध्ये सुद्धा demat account ची सेवा देतात. परंतु Demat खाते चालविण्यासाठी डीपी (DP) तुम्हाला विविध फी आकारतात. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र फी असते. ही फी कंपनीनुसार बदलू शकते. यात प्रथम शुल्क आकारले जाते ते म्हणजे खाते उघडण्याची फी (अकाउंट ओपनिंग फीस). यानंतर खाते व्यवस्थापित करण्यासाठी Annual Management charges आहेत. कंपनी ही फी अगदी सुरवातीस घेते आणि वर्षभर खाते manage करते. हे वाचा-Demat Account: 30 सप्टेंबरपर्यंत हे महत्वाचं काम पूर्ण करा, अन्यथा तुमचे डिमॅट खाते बंद होईल डिमॅट अकाउंट क्लोजर डीमॅट खाते बंद करणे जितके सोपे आहे तितकेच ते उघडणे सोपे आहे. डिमॅट अकाउंट बंद करण्यासाठी, तुम्ही सर्व खातेदारांनी (एकाहून अधिक धारकांच्या बाबतीत) स्वाक्षरी केलेला विनंती फॉर्म भरला पाहिजे.डिमॅट अकाउंट बंद करण्यापूर्वी, तुम्ही खात्यातील सर्व होल्डिंग्स पास करणे आवश्यक आहे.डिमटेरिअलायझेशनच्या कोणत्याही विनंत्या प्रलंबित असल्यास, डीपी क्लोजर सबमिशनवर प्रक्रिया करणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात