मराठी बातम्या /बातम्या /मनी /Fraud Alert: सावधान! डेबिट कार्डधारकांनो, लक्षात ठेवा ‘या’ पाच गोष्टी, नाहीतर बँक खातं रिकामं झालंच म्हणून समजा

Fraud Alert: सावधान! डेबिट कार्डधारकांनो, लक्षात ठेवा ‘या’ पाच गोष्टी, नाहीतर बँक खातं रिकामं झालंच म्हणून समजा

Fraud Alert: सावधान! डेबिट कार्डधारकांनो, लक्षात ठेवा ‘या’ पाच गोष्टी, नाहीतर बँक खातं रिकामं झालंच म्हणून समजा

Fraud Alert: सावधान! डेबिट कार्डधारकांनो, लक्षात ठेवा ‘या’ पाच गोष्टी, नाहीतर बँक खातं रिकामं झालंच म्हणून समजा

Debit Card Fraud Alert: एटीएम कार्डचा वापर वाढल्यानं डेबिट कार्डशी संबंधित फसवणुकीचं प्रमाणही वाढलं आहे. फसवणूक करणारे अनेक नवीन पद्धतींद्वारे लोकांची फसवणूक करण्याचं काम करतात. त्यामुळं काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

मुंबई, 19 जुलै: काही वर्षांपूर्वीपर्यंत, जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे काढायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागत होतं. बँकेत जाऊन तुम्हाला स्लिप भरावी लागायची आणि त्यानंतर तुम्ही लांबलचक रांगेत उभे राहून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत होता. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आता स्लिपची जागा एटीएम कार्डाने (ATM Card) घेतली आहे. म्हणजे तुम्हाला कधीही पैशांची गरज भासल्यास, तुम्ही एटीएममध्ये जाऊन तुमच्या कार्डद्वारे पैसे काढू शकता. परंतु एटीएम कार्डचा वापर वाढल्यानं डेबिट कार्डशी संबंधित फसवणुकीचं (Debit Card Fraud) प्रमाणही वाढलं आहे. फसवणूक करणारे अनेक नवीन पद्धतींद्वारे लोकांची फसवणूक करण्याचं काम करतात. त्यामुळं काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचीही डेबिट कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल. आज आपण डेबिड कार्डद्वारे फसवणूक टाळण्यासाठी काय करावं, याविषयी अधिक जाणून घेऊया.

फसवणूक टाळण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा (keep these 5 things in mind to avoid fraud)-

1. तुमचे डेबिट कार्ड किंवा पिन इतर कोणालाही देऊ नका. जर तुम्ही ते कोणाला दिलं तर कोणीही तुमचे कष्टाचे पैसे चोरू शकतो.

2. बरेच लोक त्यांच्या कार्डचा पिन त्यांच्या मोबाईलवर किंवा इतरत्र लिहितात. बरेच लोक हे कार्डवरच लिहितात, परंतु त्याऐवजी तुम्हाला तुमचा पिन नंबर लक्षात ठेवावा लागेल.

हेही वाचा: Indian Railways: तिकीट रिफंडच्या नादात कधीच करू नका 'ही' चूक, अन्यथा बँक खातं होईल रिकामं

3. बँक कर्मचारी, बँक ग्राहक सेवा इत्यादी तुम्हाला तुमचा पूर्ण डेबिट कार्ड नंबर आणि तुमचा पिन नंबर कधीच विचारत नाहीत. जर कोणी तुम्हाला कॉलवर ही माहिती विचारली, तर तुम्हाला ती कधीच देऊ नये.

4. जर तुम्ही एटीएम मशिनमध्ये पैसे काढणार असाल आणि तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत एटीएममध्ये उपस्थित असलेल्या गार्ड किंवा बँक कर्मचाऱ्याचीच मदत घ्या. अनेक लोक अज्ञात लोकांची मदत घेतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. यातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.

5. तुमचा डेबिट कार्ड नंबर किंवा पिन कोणत्याही अज्ञात वेबसाइटवर सेव्ह करू नका. विश्वासार्ह वेबसाइटवरूनच ऑनलाइन खरेदी करा.

First published:

Tags: Financial fraud, Online fraud, Shopping debit card