जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर पगारवाढ? सरकार डीए वाढण्याच्या तयारीत; पगार किती वाढणार?

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर पगारवाढ? सरकार डीए वाढण्याच्या तयारीत; पगार किती वाढणार?

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर पगारवाढ? सरकार डीए वाढण्याच्या तयारीत; पगार किती वाढणार?

DA किंवा महागाई भत्ता वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये बदलला जातो. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आधारावर DA बदलला जाऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै: नोकरदार नेहमीच पगारवाढीकडे लक्ष ठेवून असतात. त्यात सरकारी कर्मचारी म्हटलं की त्यांच्या पगारवाढीवर सर्वांचंच लक्ष असतं. आता सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढीची बातमी मिळू शकते. केंद्र सरकार पुढील महिन्यात महागाई भत्त्यात 4% वाढ जाहीर करू शकते. सतत वाढत चाललेली महागाई लक्षात घेता केंद्र सरकार डीए वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. DA किंवा महागाई भत्ता वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये बदलला जातो. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आधारावर DA बदलला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत यावेळी महागाई भत्त्यात (डीए) चांगली वाढ होऊ शकते. कारण जूनमध्ये देशातील किरकोळ चलनवाढीचा दर 7.01% वर पोहोचला आहे, जो आरबीआयच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. मार्चमध्ये केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ मंजूर केली होती. महागाईने कंबरडं मोडलंय? तज्ज्ञाकडून शिका आर्थिक बजेट कसं बनवायचं! खर्चासोबत बचतही होईल सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ उत्पन्नाच्या 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना झाला. जर सरकारने पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली तर ती मूळ वेतनाच्या 38 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. सरकारी कर्मचाऱ्यांना DA दिला जातो, तर निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत दिली जाते. सुंदर तर प्रत्येकाला दिसायचंय! सरकारी मदत घेऊन करा ‘हा’ व्यवसाय, होईल भरपूर कमाई मूळ वेतन 56,900 रुपये असेल त्यांना 38 टक्के महागाई भत्ता असेल तर त्यांना 21,622 रुपये डीए मिळेल. सध्या 34 टक्के डीए दराने 19,346 रुपये मिळत आहेत. डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच वर्षाला सुमारे 27312 रुपयांची वाढ होणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची 18 महिन्यांची थकबाकीही मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीतील 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा मुद्दा लवकरच सोडवला जाऊ शकतो आणि केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 2 लाख रुपयांची एकवेळची थकबाकी देखील मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात