DA Hike: सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यातील अनेक कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा सरकारने संपवली आहे. तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरात कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्रायजेजने बोर्ड स्तरावरील किंवा त्याहून कमी पदांच्या CPSE अधिकार्यांच्या आणि 1992 वेतन श्रेणीच्या IDA पॅटर्नचे अनुसरण करणाऱ्या गैर-संघीय पर्यवेक्षकांच्या महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कार्यालयीन निवेदनात सार्वजनिक उपक्रम विभागाने अशा कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये बदल करण्याबाबत सांगितले आहे.
कधीपासून लागू होणार नवीन दर? DA चे सुधारित दर 1 जुलै 2023 पासून लागू होतील. 3,500 रुपयांपर्यंतच्या मूळ वेतनासाठी, 1 जुलै 2023 पासून डीए 701.9 टक्के वेतन असेल. तर किमान 15,428 रुपये असेल. 3,501 ते 6,500 रुपये प्रति महिना मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 पासून किमान 24,567 रुपये डीए आणि पगाराच्या 526.4 टक्के रक्कम मिळेल. 6,500 ते 9,500 रुपयांपर्यंत मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीए 421.1 टक्के असेल आणि किमान 34,216 रुपये असेल. SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग हे 5 मंत्र अवश्य घ्या जाणून दर तीन महिन्यावर मिळेल रिवाइज डीए विभागाकडून सांगण्यात आलंय की, क्वाटरली इंडेक्स अॅव्हरेज 1099 (1960=100) पेक्षा जास्त मूल्य वृद्धीच्या आधारावर दर वर्षी डीएचे हप्ते 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरपासून देय होतात. भारत सरकारच्या सर्व प्रशासकीय मंत्रालयांना/विभागांना वरील बाबी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील CPSE च्या निदर्शनास आणून देण्यास सांगितले आहे. SBI आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार ‘ही’ खास सुविधा डीएचे सुधारित रेट काय? ऑफिस मेमोरेंडममध्ये डीपीईच्या दिनांक 25.06.1999 च्या परिशिष्ट-III मध्ये ऑफिस मेमोरँडममध्ये उल्लेख केला आहे. यामध्ये बोर्ड स्तरावर आणि CPSEs च्या बोर्ड स्तरावरील अधिकारी आणि गैर-संघीय पर्यवेक्षकांना देय DA चे दर दर्शवले आहेत. CPSE अधिकारी आणि गैर-संघीय पर्यवेक्षकांसाठी, 1 जुलै 2023 पासून देय DA चा दर 416 टक्के आहे.