जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 500 रुपयांच्या नोटविषयी RBI ची महत्त्वपूर्ण सूचना! तुमच्याजवळही असेल तर....

500 रुपयांच्या नोटविषयी RBI ची महत्त्वपूर्ण सूचना! तुमच्याजवळही असेल तर....

भारतीय नोट

भारतीय नोट

केंद्र सरकारकडून केलेल्या नोटबंदीनंतर भारतीय करेंसीविषयी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. जर तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 एप्रिल: भारतात नोटबंदी सुरु झाली होती. केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या नोटबंदीनंतर भारतीय करेंसीविषयी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत असतात. तुमच्याजवळही जर 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 500 रुपयांच्या नोटविषयी रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. मार्केटमध्ये दोन प्रकारच्या 500 च्या नोट सापडत आहेत. दोन्हीही नोटांमध्ये खूप कमी फरक आहे. या दोन्हीमधून एक प्रकारची नोट ही नकली असल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये नोट नकली असल्याचं सांगितलं जातंय. आज आपण पाहूया की, असली नोट कोणती आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हिडिओमध्ये म्हटलंय की, ज्या 500 च्या नोटमध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या सिग्नेचरपासून जाते किंवा गांधीजींच्या फोटोज्या खूप जवळ असते अशी कोणतीही नोट घेऊ नये. या व्हिडिओमध्ये म्हटलंय की, एक प्रकारची नोट ही बनावट आहे. या व्हिडिओविषयी पीआयबीने फॅक्ट चेक केलंय, ज्यानंतर याची सत्यता समोर आली आहे.

दोन्ही प्रकरच्या नोट असली आहेत

व्हिडिओ फॅक्ट चेकनंतर सत्यता समोर आली की, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. बाजारात चालू असलेल्या दोन्ही प्रकारच्या नोट खऱ्या आहेत. तुमच्याजवळ 500 ची कोणतीही नोट असेल तर अजिबात घाबरु नका. आरबीआयने म्हटले की, दोन्ही प्रकारच्या नोट मान्य आहेत.

व्हायरल मॅसेजची सत्यता काय?

तुम्हालाही एखादा मॅसेज आला असेल तर अजिबात घाबरु नका. तसंच अशा प्रकारचे खोटे मॅसेज कोणासोबतच शेअर करु नका. अशा प्रकारे तुम्हीही कोणत्याही प्रकारच्या बातमीचा फॅक्स चेक करु शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या ऑफिशियल लिंकवर व्हिजिट करावी लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअप नंबर +91879971125 या ईमेल :pibfactcheck@gmail.com वरही व्हिडिओ पाठवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात