जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जनतेसाठी मोठी घोषणा केली. पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Prices) वाढते दर कमी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जुलै : जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत (Crude Oil Prices Hike) आज सकाळी सुमारे 114 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली, जी सोमवारी सकाळी 111 डॉलर होती. दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एका वेळी प्रति बॅरल140 डॉलरवर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 113.8 डॉलर होती, जी गेल्या आठवड्यात प्रति बॅरल 119 डॉलरवर पोहोचली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जनतेसाठी मोठी घोषणा केली. पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Prices) वाढते दर कमी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे. SBI ग्राहकांची कामं आता घरबसल्या होणार; ‘हे’ टोल फ्री फोन नंबरवर येतील कामी चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर » मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुप » दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर » चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर » कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. Post Office Schemes: पाच वर्ष गुंतवणुकीचे उत्तम पर्याय, जास्त परतावा आणि सिक्युरिटीही तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात