मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. त्याचा कधी थेट तर कधी नकळत परिणाम कच्चा तेलावर होत आहे. जगभरात आर्थिक मंदीचं सावट आहे. कच्च्या तेलात गेल्या एक महिन्यात मंदी दिसून आली आहे.
गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील का? भारताला त्याचा फायदा होईल असा दुसरा काही मार्ग आहे का?
कच्च्या तेलाचा भाव या वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मार्च 2022 मध्ये 129 डॉलर प्रति बॅरलवर असलेला कच्च्या तेलाचा भाव आता 76 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला आहे. गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यातील अनिश्चिततेचा परिणाम आता जवळपास संपल्याचं आता दिसत आहे. अजूनही जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची चिंता आहेच. त्यामुळे मागणी वाढली तर ते आव्हानात्मक ठरू शकतं.
ही सगळी परिस्थिती पाहता कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारताला फायदा होईल की तोटा होईल? आपल्या खिशावरचा महागडा पेट्रोल-डिझेलचा भार कमी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेणार आहोत.
तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही पेट्रोल-डिझेल
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक अर्थव्यवस्थेत सुस्ती येण्याची चिन्हे आहेत. जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये मंदीची भीती आहे. याशिवाय महागाईला लगाम घालण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका सतत व्याजदरात वाढ करत असतात.
चीनमध्ये कोविडबाबतचे कडक निर्बंध आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना वाढण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
रशियातील कच्च्या तेलाचे उत्पादन युद्धपूर्व पातळीवर पोहोचले आहे. परंतु पाश्चिमात्य देशांकडून रशियन तेलावर प्रति बॅरल ६० डॉलरची किंमत मर्यादा खूपच जास्त मानली जाते. याचा परिणाम रशियन तेलाच्या निर्यातीवर होऊ शकतो. याचा अधिक विचार केला जात आहे. याचा परिणाम रशियन तेलाच्या निर्यातीवर होऊ शकतो.
पेट्रोल-डिझेल की सीएनजी? तुमचाही होतोय गोंधळ? कोणताही निर्णय घेण्याआधी ह्या फॅक्ट्स वाचा
पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होणार?
देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीशी निगडित आहे. मात्र यंदा एप्रिलपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे देशांतर्गत कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आता देशांतर्गत तेल कंपन्या आपला तोटा भरून काढण्यावर भर देणार आहेत.
स्वस्त कच्च्या तेलाचा भारताला कसा फायदा होईल?
कच्च्या तेलातील घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले नाहीत तरी दुसऱ्या आघाडीवर भारताला फायदा होऊ शकतो. कच्चे तेल स्वस्त झाल्याने भारताचे आयात बिल कमी होणार आहे. त्यामुळे व्यापार तूट कमी होईल. सोप्या भाषेत सांगायचे तर एकूण आयातीवरील खर्च आणि निर्यातीतून मिळणारे उत्पन्न यातील तफावत कमी असेल.
स्वस्त कच्च्या तेलाचा अर्थ असा आहे की भारताला पेमेंटसाठी कमी डॉलर्सची आवश्यकता असेल. त्याचबरोबर ऊर्जेच्या किमती कमी झाल्याने महागाईही कमी होईल. त्याचबरोबर रुपया मजबूत होईल आणि व्याजदर वाढवण्यासाठी आरबीआयवरचा दबावही कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike