जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरुन 'ही' कामं करताय का? आर्थिक संकटात अडकण्यापासून स्वत:ला वाचवा

Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरुन 'ही' कामं करताय का? आर्थिक संकटात अडकण्यापासून स्वत:ला वाचवा

क्रेडिट कार्ड वापरू नका
सामान्यतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुम्ही नंतर पैसे भरण्याच्या नावाखाली खूप खर्च करता, त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम वापरा, म्हणजे खर्च करताना हात आपोआप आखडता घेतला जातो.

क्रेडिट कार्ड वापरू नका सामान्यतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुम्ही नंतर पैसे भरण्याच्या नावाखाली खूप खर्च करता, त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम वापरा, म्हणजे खर्च करताना हात आपोआप आखडता घेतला जातो.

परदेशात क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुम्हाला परकीय चलन व्यवहार शुल्क (Foreign currency transaction charges) भरावे लागेल. त्याच वेळी, एक्सचेंज रेटमधील चढउतारांचा देखील परिणाम होतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर : सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर (Credit Card Use) सातत्याने वाढत आहे. लोक विशेषतः ऑनलाइन बिल पेमेंट आणि खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरण्यास प्राधान्य देतात. क्रेडिट कार्ड वापरताना, हे लक्षात ठेवले पाहिजे की हे एक प्रकारचे कर्ज आहे जे नंतर परत करावे लागेल. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरणे टाळले पाहिजे. एटीएममधून पैसे काढणे जर तुम्हाला वाटत असेल की क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून (ATM Withdrawal ) पैसे काढणे ही एक मोठी सोय आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला पैसे भरण्यासाठी वेळ मिळत नाही. रोख रक्कम काढल्यानंतर लगेचच व्याज आकारण्यास सुरुवात होते. दरमहा 2.5 ते 3.5 टक्के व्याज असू शकते. यावर तुम्हाला फ्लॅट ट्रान्झॅक्शन टॅक्स (Flat transaction Tax) देखील भरावा लागेल. आंतरराष्ट्रीय व्यवहार तुम्ही परदेशात क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुम्हाला परकीय चलन व्यवहार शुल्क (Foreign currency transaction charges) भरावे लागेल. त्याच वेळी, एक्सचेंज रेटमधील चढउतारांचा देखील परिणाम होतो. परदेशात रोख रक्कम वापरायची नसेल तर क्रेडिट कार्डऐवजी प्रीपेड कार्ड वापरा. Online Fraud : तुमच्या बँक अकाऊंटमधून बेकायदेशीररित्या पैसे गायब झाल्यास काय कराल? क्रेडिट लिमिट क्रेडिट कार्ड वापरताना क्रेडिट लिमिट (Credit Limit) नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या लिमिटपेक्षा जास्त खर्च केल्यास कंपनी तुमच्याकडून शुल्क आकारते. क्रेडिट लिमिटच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त वापरल्याने CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. मिनिमम ड्यु ऑप्शन क्रेडिट कार्ड बिलामध्ये (Credit Card Bill) ड्यु अमाऊंटचे दोन प्रकार आहेत - टोटल अमाऊंट ड्यु (Total Amount Due) आणि मिनिमम ड्यु अमाऊंट (Minimum Due Amount). मिनिमम ड्यु अमाऊंडमध्ये कमी पैसे द्यावे लागतील. जर तुम्ही हा पर्याय वापरलात, तर लक्षात ठेवा की त्यावरवर प्रचंड व्याज आकारले जाते. संपूर्ण रकमेवर व्याज आकारले जाते. म्हणून, पेमेंट करताना, टोटल ड्यु अमाऊंटचा पर्याय निवडा. Bank of Baroda ने ग्राहकांना पाठवला अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून लागू होतोय हा नियम बँलेन्स ट्रान्सफर बँलेन्स ट्रान्सफरचा (Balance Transfer) पर्याय हुशारीने वापरा. बँलेन्स ट्रान्सफरचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डांपैकी कोणत्याही अन्य क्रेडिट कार्डची बिले भरू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही व्याजही द्यावे लागेल. बॅलन्स ट्रान्सफर अशा प्रकारे कधीही करू नका की तुम्ही एका कार्डचे बिल दुसऱ्या कार्डवरून, नंतर दुसऱ्याचे तिसरे आणि तिसऱ्याचे ते चौथ्या कार्डचे बिल भरता. असे केल्याने तुमचा CIBIL स्कोर खराब होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात