जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका 'या' चुका, अन्यथा...

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका 'या' चुका, अन्यथा...

क्रेडिट कार्ड बिल

क्रेडिट कार्ड बिल

Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरणे सुरक्षित आणि सोयीचे आहे. परंतु फायद्यासोबतच याचे नुकसानही आहे. ग्राहकांना कार्ड देताना क्रेडिट कार्ड कंपन्या फक्त त्याचे फायदे सांगतात. त्या तोट्याविषयी माहिती देत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 मे: ऑनलाइन शॉपिंग असो किंवा मग कोणतंही ट्रांझेक्शन आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर खूप वाढलाय. गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्ड यूझर्सच्या संख्येसोबतच त्याद्वारे होणाऱ्या ट्रांझेक्शनमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डचा वापर वाढवण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कोणतीही खरेदी केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सुमारे 50 दिवसांचा चांगला वेळ मिळतो. हे आपत्कालीन वापरासाठी देखील फायदेशीर असतं. मात्र ते वापरताना काही चुकांमुळे तुमचे मोठे नुकसानही होऊ शकते. या नुकसानाविषयी बँकांनी माहिती दिलेली नसते. चला तर मग जाणून घेऊया क्रेडिट कार्डचे तोटे कोणते?

News18लोकमत
News18लोकमत

क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे

क्रेडिट कार्ड वापरणं सुरक्षित आणि सोयीचं असतं. परंतु त्याचे अनेक तोटे आहेत. ग्राहकांना कार्ड देताना क्रेडिट कार्ड कंपन्या त्याचे फायदे तर सांगतात मात्र तोटे सांगत नाहीत. यामुळेच कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड वापरता सावध राहणं गरजेचं असतं. असं केल्याने तुम्ही मोठ्या आर्थिक नुकसानापासून स्वतःचा बचाव करु शकता.

1- बिल वेळेवर भरा

क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरणं गरजेचं असतं. असं न केल्याने तुम्हाला आर्थिक भुर्दंड लागू शकतो. क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट ठरलेल्या वेळी न भरल्याने तुम्हाला काय नुकसान होते याचं कोणतंही रिमांडर येत नाही. तुम्ही ठरलेल्या वेळी क्रेडिट कार्ड बिल भरु शकला नाही तर तुम्हाला लेट फिस आकारली जाते. यासोबतच क्रेडिट स्कोअरही खराब होतो.

2- टोटल ड्यू पेमेंट

क्रेडिट कार्ड बिल तुमच्याकडे येतं तेव्हा त्यात दोन रक्कम लिहिली जाते. Total Due (एकूण देय)आणििMinimum Due (किमान देय). किमान थकबाकी भरूनही आपले काम होईल, असे अनेकांना वाटते. परंतु हे अजिबात करू नका. तुम्ही एकूण थकबाकीची रक्कम न भरल्यास क्रेडिट कार्ड कंपन्या खूप जास्त व्याज आकारतात. यामुळे, तुमचं बिल दर महिन्याला मोठ्या प्रमाणात वाढते. क्रेडिट कार्ड तुम्हाला हे सांगत नाहीत.

Investment Tips: एफडी प्रमाणे व्याज देतात ‘या’ सरकारी योजना, पाहा पूर्ण लिस्ट!

3- Free EMI संबंधित समस्या

जेव्हा तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करता तेव्हा कंपन्या त्या ट्रांझेक्शनला नो कॉस्ट ईएमआयमध्ये मोफत रूपांतरित करण्याचे वचन देतात. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यावर अनेक नियम आणि अटी लागू आहेत. तुम्ही कोणत्याही अटी आणि नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला खूप जास्त व्याज द्यावे लागेल.

4- रिवॉर्ड्स पॉइंटचं गणित

क्रेडिट कार्ड कंपन्या किंवा बँका क्रेडिट कार्ड जारी करताना फीचर्स सांगताना अनेकदा रिवॉर्ड पॉइंट्सचा उल्लेख करतात. परंतु नंतर ते हे पॉइंट्स कसे रिडीम केले जाऊ शकतात हे सांगत नाहीत. हे Rewards Points असेच एक्सपायर होतात आणि ग्राहक त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत.

तुम्हाला 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा फोन घ्यायचायं? हे आहेत बेस्ट फोन्स

5- अपग्रेड फी मध्ये वाढ

बँका तुम्हाला अनेकदा ऑफर देतात की तुम्ही तुमचे सिल्व्हर कार्ड गोल्ड आणि गोल्डला प्लॅटिनममध्ये मोफत अपग्रेड करू शकता. पण नवीन क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला रु. 500 ते 700 द्यावे लागतील हे तुम्हाला सांगितलं जात नाही. क्रेडिट कार्डधारकांना अनेकदा फोन येतो की तुमच्या क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा मोफत वाढवली जात आहे, परंतु बँक तुम्हाला कधीच सांगत नाही की मर्यादा वाढवण्याबरोबरच तुमच्या कार्डची वार्षिक फी देखील त्यानुसार वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात