Home /News /money /

Corona वाढीचा वेग अर्थव्यवस्थेला लावू शकतो ब्रेक; सरकारकडून नव्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता

Corona वाढीचा वेग अर्थव्यवस्थेला लावू शकतो ब्रेक; सरकारकडून नव्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

देशभरातील विविध राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या सर्वासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

    नवी दिल्ली, 15 एप्रिल: देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus spike) पाहता महाराष्ट्रा (Maharashtra)सह अनेक राज्यांनी कठोर निर्बंध (strict restrictions) लावले आहेत. या लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (economy) बसण्याची शक्यता आहे. एका अहवालात म्हटले आहे की, देशातील महत्वाच्या शहरांत कठोर निर्बंध लागू झाले आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला दर आठवड्याला सरासरी 1.25 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. यासोबतच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी (GDP) वाढीचा दर 1.40 टक्क्यांनी प्रभावित होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे अर्थव्यवस्थेने पकडलेल्या गतीला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत केंद्र सरकार (Central Government) आणखी एक मदतीचं पॅकेज (Relief package) जाहीर करु शकतं. नव्या पॅकेजमध्ये काय असू शकतं? जर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गरिबांच्या दैनंदिन व्यवस्थेवर परिणाम होत असेल तर केंद्र सरकार गरिबांसाठी एक पॅकेज जाहीर करुन दिलासा देऊ शकतं. या संबंधितली माहिती असलेल्या तीन जणांनी याची माहिती दिली आहे. सरकारने गेल्यावर्षी 26 मार्च ते 17 मे या कालावधीत आर्थिक प्रोत्साहन सवलत पॅकेज जाहीर केले होते. जेणेकरुन प्रभावित झालेल्या व्यवसायांना या पॅकेजच्या माध्यमातून आर्थिक मदत होईल. केंद्र सरकारने हे आर्थिक पॅकेज 20.97 लाख कोटी रुपयांचे जाहीर केले होते. वाचा: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही मागणी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, सरकारकडून संपूर्ण पणे लॉकडाऊन लावण्यात येणार नाहीये. देशभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केवळ स्थानिक स्तरावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. उद्योग क्षेत्रातील विशेषत: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) कोणत्याही गरजांना सरकार प्रतिसाद देत मदत करेल. जेणेकरुन आर्थिक कामे आणि उदरनिर्वाहात व्यत्यय येणार नाहीत. देशभरात लसीकरणात वाढ कोरोनाचा धोका जास्त असलेल्या वयोगटातल्या लोकांचे या विषाणू विरोधात लसीकरण करण्याच्या प्रयत्नात भारत मोठी प्रगती करत आहे. 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण उत्सव करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली हाक लक्षात घेत सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. या लसीकरण उत्सवात एकूण 1.28 कोटीहून जास्त लसींचे डोस देण्यात आले. देशभरात आतापर्यंत एकूण 16,98,138 सत्रांद्रवारे 11,44,93,238 लसींचे डोस देण्यात आले आहे. यापैकी 90,64,527 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, 56,04,197 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Economy, India

    पुढील बातम्या