राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही मागणी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही मागणी

CM Uddhav Thackeray letter to PM Narendra Modi: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सराकरने कठोर निर्बंध लागू केले आहेत

  • Share this:

मुंबई, १५ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Coronavirus 2nd wave in Maharashtra) आल्याचं पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) 14 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे 2021 पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यासोबतच इतरही कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) निर्माण झाला आहे. यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजनचा होणारा पुरवठा त्वरित व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे.

राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या संदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि सहकार्य मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे.

आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण देशभरात एकूण 10.5 लाख सक्रिय रुग्ण होते. मात्र, सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा अंदाज घेता आणि राज्यात पारदर्शक पद्धतीने चाचण्यांच्या आधारे महाराष्ट्रात सध्याच्या वाढीनुसार 30 एप्रिल 2021 पर्यंत 11.9 लाख बाधितांची नोंद होऊ शकते. सध्यस्थितीत महाराष्ट्रात 5.64 लाख सक्रिय रुग्ण आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 88 टक्क्यांनी अधिक आहे."

वाचा: COVID-19 New Strain: कोरोनाचा नवा स्ट्रेन डोळ्यांवर करतोय परिणाम, ऐकण्याची क्षमताही होतेय कमी

आम्ही राज्यातील स्थिती पाहता केंद्र सरकारला पुढील परिस्थितीसंदर्भातील अंदाज सांगितला आहे. राज्यातील सर्वात मोठी चिंता म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आज राज्यात 1200 मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला 2 हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आम्ही देखील स्थानिक व आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करत आहोत. मात्र, वेळ वाचवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थआपन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गांनी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्रात पुढे लिहिलं, आणखी एक विनंती म्हणजे कोविड 19 बाधितांसाठी उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेच्या संदर्भात आहे. भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो. इंडियन पेटंट एक्ट 1970 च्या कलम 92 नुसार या औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरुपी परवाने द्यावेत जेणेकरून ते रेमडेसिवीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील.

Published by: Sunil Desale
First published: April 15, 2021, 2:58 PM IST

ताज्या बातम्या