जाहिरात
मराठी बातम्या / मनी / CNG Price : राज्य सरकारने सीएनजीवरील VAT कमी केला, सर्वसामान्यांना प्रतिकिलो किती फायदा होणार?

CNG Price : राज्य सरकारने सीएनजीवरील VAT कमी केला, सर्वसामान्यांना प्रतिकिलो किती फायदा होणार?

CNG Price : राज्य सरकारने सीएनजीवरील VAT कमी केला, सर्वसामान्यांना प्रतिकिलो किती फायदा होणार?

महाराष्ट्र सरकारने सांगितले की, आता 13.5 टक्क्यांऐवजी राज्यात सीएनजीवर केवळ 3 टक्के व्हॅट आकारला जाईल. म्हणजेच व्हॅटमध्ये थेट 10.5 टक्के कपात करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च : महाविकास आघाडी सरकारने 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात सीएनजीवरील व्हॅट (Value Added Tax) 10 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना सीएनची दरात (CNG Price) घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने सांगितले की, आता 13.5 टक्क्यांऐवजी राज्यात सीएनजीवर केवळ 3 टक्के व्हॅट आकारला जाईल. म्हणजेच व्हॅटमध्ये थेट 10.5 टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना सीएनजी प्रतिकिलो 5.75 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमती प्रति किलो 1 रुपयांनी वाढल्या होत्या. 20 रुपयांची वाढ करण्यात आली व्हॅट कमी करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने गेल्या 7 महिन्यांत सीएनजीच्या किमतीत सुमारे 20 रुपयांनी वाढ केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने जुलै 2021 मध्ये CNG च्या किमतीत 2.58 रुपये प्रति किलोने वाढ केली होती. तेव्हा सीएनजीची किंमत 50 रुपये किलोपेक्षा कमी होती. यानंतर राज्यात दर वाढतच राहिले आणि आता दर किलोमागे 70 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. Senior Citizen Saving Scheme : 31 मार्च आधी बचत खाते लिंक करा, अन्यथा रोख व्याज मिळणार नाही दर महिन्याला भाव वाढवले महाराष्ट्रात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीएनजीची किंमत 2 रुपयांनी वाढून 54.57 रुपये प्रति किलो झाली होती. पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये पुन्हा 3.06 रुपये प्रति किलोने भाव वाढवण्यात आले. यानंतर 17 डिसेंबरला पुन्हा एकदा मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ झाली आणि दर 63.50 रुपये किलोवर पोहोचला. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीची किंमत 66 रुपये प्रति किलो, तर पीएनजीची किंमत 38 रुपये प्रति एमसीएम वरून 39.50 रुपये प्रति एमसीएम इतकी वाढवली आहे. EPFO चा नोकरदार वर्गाला मोठा धक्का, ‘या’ 4 प्रकारे तुम्ही PF बॅलन्स तपासू शकता भाड्यात कपात, चालकांना दिलासा सीएनजीच्या दरात घट झाल्याने सर्वसामान्यांना प्रवास करणे स्वस्त होणार आहे. मुंबईत मोठ्या संख्येने ऑटोचालक सीएनजीवरच वाहन चालवतात आणि दर कमी झाल्यास त्यांना दिलासा मिळेल. याशिवाय वाहने चालवणाऱ्यांनाही स्वस्त इंधन मिळेल. मालवाहतुकीचे शुल्कही कमी असेल, तर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीही कमी होऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात