मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोमवारी पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ऐन सणासुदीच्या काळात इंधन दरात वाढ होण्याची भीती सर्वसामान्य नागरिकांना आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 2.72 टक्क्यांनी वाढून 87.46 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. WTI प्रति बॅरल 81.62 डॉलरने विकले जात आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त तर काही राज्यांमध्ये महाग झालं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 0.51 रुपयांनी वाढून 108.58 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 0.46 रुपयांनी वाढून 93.81 रुपये प्रति लिटर झालं आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल 0.14 तर डिझेल 0.13 रुपयांनी वाढलं आहे. दुसरीकडे बिहारमध्ये पेट्रोल 0.36 रुपयांनी स्वस्त झालं आहे. डिझेल 0.34 रुपयांनी घसरलं असून 95.54 रुपये प्रति लीटर ग्राहकांना मोजावे लागत आहेत. देशातील चार महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला नाहीच. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नाही.दिल्लीमध्ये नागरिकांना पेट्रोलसाठी 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर पैसे मोजावे लागत आहेत. मुंबईतील नागरिकांना पेट्रोलसाठी 106.31 रुपये आणि डिझेलसाठी 94.27 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत. दुसरीकडे कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दर आहेत. रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. त्यावर टॅक्स आणि एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन वॅट अशा अनेक गोष्टी लागून त्याचे भाव जास्त होत असतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. तुम्हाला घसबसल्याही तुमच्या शहरातील दर तपासता येऊ शकतात. तुम्ही SMSद्वारे पेट्रोल डिझेलचे रोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवला तर माहिती मिळू शकते. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील दर चेक करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.