जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अरे देवा! पुन्हा एकदा वाढला CNG-PNG, पाहा किती रुपयांना मिळणार

अरे देवा! पुन्हा एकदा वाढला CNG-PNG, पाहा किती रुपयांना मिळणार

अरे देवा! पुन्हा एकदा वाढला CNG-PNG, पाहा किती रुपयांना मिळणार

सीएनजी-पीएनजीच्या किमती पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: मुंबईकरांसाठी महागाईची आणखी तीव्र झळ बसणार आहे. पाव महागल्यानंतर आता CNG आणि PNG च्या दरात वाढ करण्यात आली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टी महाग होत आहेत. त्यामुळे रोज खिशाला कात्री लागत आहे. मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. सीएनजी-पीएनजीच्या किमती पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. रात्री 12 वाजल्यापासून नव्या किमती लागू करण्यात आल्या. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 3.5 रुपयांची वाढ केली. तर पीएनजीच्या किंमतीत प्रति एससीएम 1.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) शुक्रवारी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींमध्ये बदल केले. एमजीएलने वाढत्या खर्चाचे कारण देत ही वाढ केली आहे. याशिवाय गॅसचा कमी पुरवठा हेही या वाढीचे प्रमुख कारण आहे.

Money Mantra - प्रमोशन, हवी तिथं बदली; आर्थिक राशिभविष्यानुसार नोकरदारांसाठी आजचा दिवस उत्तम

आता मुंबईत साडेतीन रुपयांची वाढ झाल्यानंतर सीएनजीचा भाव 89.50 रुपये किलो झाला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत पीएनजीची किंमत 1.5 रुपयांच्या वाढीसह प्रति एससीएम 54 रुपये झाली आहे. याआधी देखील महागाईमुळे ऑक्टोबर महिन्यात गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. महानगर गॅस लिमिटेडने दर वाढवले होते. गेल्या महिन्यात, एलजीएलने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किंमतीत मुंबईमध्ये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरमागे 4 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर सीएनजीची किंमत 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजीची किंमत 52.50 रुपये प्रति एससीएम होती.

Home Loan Documents : होम लोनसाठी कोणती कागदपत्रं असतात आवश्यक? जाणून घ्या…

मुंबईत सीएनजी-पीएनजीचे दर यंदा वाढतच चालले आहेत. त्यामुळे वाहतुकीसह स्वयंपाकघरापर्यंत अनेक गोष्टींना त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. 1 एप्रिल रोजी सीएनजीचा भाव 60 रुपये किलो होता, तो आता 30 रुपयांनी वाढून 89.50 रुपये किलो झाला.

News18लोकमत
News18लोकमत

पीएनजीची किंमत प्रति एससीएम 36 रुपयांवरून 54 रुपये प्रति एससीएम झाली आहे. गेल्या 8 महिन्यात जवळपास 30 रुपयांनी दोन्ही महाग झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gas , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात