जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सामान्यांना बसणार झटका! पुढील महिन्यात 10-11 टक्क्यांनी वाढू शकतात CNG चे दर

सामान्यांना बसणार झटका! पुढील महिन्यात 10-11 टक्क्यांनी वाढू शकतात CNG चे दर

सामान्यांना बसणार झटका! पुढील महिन्यात 10-11 टक्क्यांनी वाढू शकतात CNG चे दर

सामान्यांना ऑक्टोबर महिन्यात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये सीएनसी (CNG) आणि पीएनजी (PNG) चे दर 10 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: सामान्यांना ऑक्टोबर महिन्यात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये सीएनसी (CNG) आणि पीएनजी (PNG) चे दर 10 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज कंपनी आयसीआयसीआय सिक्योरिटीज (ICICI Securities) ने असा अंदाज व्यक्त केला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, सरकारद्वारे निर्धारित गॅसच्या किमतीत सुमारे 76 टक्के वाढ होणार आहे, ज्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींवरही होईल. सरकार गॅस सरप्लसच्या देशांचे दर वापरते. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनसीजीसारख्या कंपन्यांना नामांकनाच्या आधारावर देण्यात आलेल्या क्षेत्रांसाठी नैसर्गिक वायूच्या किमतींचा सरकार दर सहा महिन्यांनी आढावा घेते. पुढील पुनरावलोकन 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 3.15 डॉलर प्रति यूनिट होईल अॅडमिनिस्टर्ड रेट आयसीआयसीआय सिक्योरिटीजने म्हटले आहे की 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत APM किंवा अॅडमिनिस्टर्ड रेट  (Administered Rate) 3.15 डॉलर प्रति युनिट (MMTTU) पर्यंत वाढेल. सध्या हा दर प्रति युनिट $ 1.79 आहे. हे वाचा- 17 सप्टेंबरपर्यंत 50000 रुपये कमावण्याची संधी, मोदी सरकारसाठी करावं लागेल हे काम रिपोर्टनुसार, ‘एपीएम गॅस किंमतीत झालेली वाढ सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपन्यांसाठी आव्हान असणार आहे. याचा अर्थ असा की याकरता सीएनसी आणि पीएनजीचा खर्च वाढेल. एपीएम गॅसच्या किमती वाढल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीचे वितरण करणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लि. (IGL) ला पुढील एका वर्षात किमतींमध्ये प्रचंड वाढ करावी लागेल. मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही असेच पाऊल उचलावे लागेल. शहर गॅस वितरण कंपन्यांना किमती 10-11 टक्क्यांनी वाढवाव्या लागतील’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: delhi , money , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात