मराठी बातम्या /बातम्या /मनी /सर्वसामान्यांच्या खिशाला चाप; पेट्रोल-डिझेलनंतर नॅच्युरल गॅसही महागला, CNG, PNG दरात वाढ

सर्वसामान्यांच्या खिशाला चाप; पेट्रोल-डिझेलनंतर नॅच्युरल गॅसही महागला, CNG, PNG दरात वाढ

MGL ने (Mahanagar Gas Limited) सोमवारी सीएनजी गॅस (CNG Gas) आणि पीएनजीच्या (PNG) किंमतीत तात्काळ प्रभावाने वाढ केली आहे.

MGL ने (Mahanagar Gas Limited) सोमवारी सीएनजी गॅस (CNG Gas) आणि पीएनजीच्या (PNG) किंमतीत तात्काळ प्रभावाने वाढ केली आहे.

MGL ने (Mahanagar Gas Limited) सोमवारी सीएनजी गॅस (CNG Gas) आणि पीएनजीच्या (PNG) किंमतीत तात्काळ प्रभावाने वाढ केली आहे.

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : सरकारने मागील आठवड्यात नॅच्युरल गॅसच्या (Natural Gas) किंमतीत 62 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर MGL ने (Mahanagar Gas Limited) सोमवारी सीएनजी गॅस (CNG Gas) आणि पीएनजीच्या (PNG) किंमतीत तात्काळ प्रभावाने 2 रुपयांची वाढ केली आहे. पुरवठा किंमतीत तीव्र वाढ लक्षात घेता, कंपनी CNG 2 रुपये प्रति किलो आणि घरगुती PNG 2 प्रति एससीएम वाढण्यात आलं असल्याची माहिती, MGL ने एका निवेदनात दिली.

नॅच्युरल गॅसचा उपयोग फर्टिलायजर, वीज उत्पादन आणि CNG Gas तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि फर्टिलायजरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिल 2019 नंतर किंमतीत झालेली ही पहिली वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने गॅसचे दर वाढले आहेत.

मुंबईतील दर -

दरवाढीनंतर मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजी आणि डोमॅस्टिक पीएनजीच्या किंमतीत सर्व टॅक्स मिळून स्लॅब 1 ग्राहकांसाठी CNG 54.57 रुपये/किलोग्रॅम आणि PNG 32.67 रुपये/एससीएम आहे. तर स्लॅब 2 ग्राहकांसाठी 38.27 रुपये/एससीएम होईल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नॅच्युरल गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे याचा घरगुती बाजारावर मोठा परिणाम होतो आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात नॅच्युरल गॅसच्या किंमती 2.2 डॉलरपर्यंत होत्या. आता 2021 मध्ये हा दर 5.5 डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

Natural Gas दरवाढीची काय आहेत कारणं?

सर्वात महत्त्वाचं कारण जगभरात गॅसच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणं हे आहे. त्याशिवाय अमेरिकेत नॅच्युरल गॅसचं उत्पादन कमी झालं आहे. उत्पादन 52 bcf दर आठवड्यावरुन घसरुन ते 46 bcf प्रति आठवड्यावर पोहोचलं आहे. तसंच, चीनमध्ये नॅच्युरल गॅसच्या आयातीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोळशाच्या किंमती वाढल्यानेही नॅच्युरल गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Petrol Diesel hike