मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Phonepe, Paytm वरुन रिजार्च करताना तुमच्याकडून किती जास्त पैसे आकारले जातात? चेक करा

Phonepe, Paytm वरुन रिजार्च करताना तुमच्याकडून किती जास्त पैसे आकारले जातात? चेक करा

Paytm आणि Phonepe वरून मोबाईल रिचार्ज किंवा बिल पेमेंट करत असाल यासाठी सरचार्ज / प्लॅटफॉर्म फी / सर्विस चार्ज या नावाने काही रक्कम आकारत आहेत.

    मुंबई, 23 जुलै : यूपीआयमुळे डिजिटल पेमेंट करणे अत्यंत सोपं बनलं आहे. विविध अॅप्सच्या मदतीने पैसे झटपट ट्रान्सफर केले जातात आणि आपला वेळ देखील वाचतो. तुम्ही देखील पेटीएम आणि फोनपे वापरत असाल तर लक्षपूर्वक करा. कारण तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे का हे तपासून घ्या. Paytm आणि Phonepe वरून मोबाईल रिचार्ज किंवा बिल पेमेंट करत असाल यासाठी सरचार्ज / प्लॅटफॉर्म फी / सर्विस चार्ज या नावाने काही रक्कम आकारत आहेत. जेव्हा तुम्ही मोबाईल रिचार्ज करता किंवा बिल पेमेंट करता किंवा रिचार्ज करता त्यावेळी तुमच्या लक्षात येत नाही की कंपन्या आता मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. TDS Refund: जास्त टीडीएस कापला गेलाय? 'या' सोप्या पद्धतीनं परत मिळू शकतात पैसे PhonePe मोबाईल रिचार्जसाठी 1 ते 2 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारत आहे. हे अतिरिक्त शुल्क कोणत्याही पेमेंट मोडसह (UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फोन पे वॉलेट) रिचार्जवर लागू आहे. जर तुम्ही 100 रुपयांचा मोबाईल रिचार्ज केला तर तुम्हाला 101 रुपये द्यावे लागतील. कंपनी तुमच्याकडून हा 1 रुपया घेत आहे. SBI WhatsApp Banking : आता बँकेत जाण्याची गरजच नाही; WhatsApp वरच करा बँकेची ही कामं पेटीएम सरचार्ज Paytm ने काही दिवसांपासून मोबाईल रिचार्ज किंवा बिल पेमेंटवर सरचार्ज आकारण्यास सुरुवात केली आहे. मोबाइल रिचार्जवर सरचार्ज 1 ते 6 रुपयांदरम्यान आहे. हे सरचार्ज तुमच्याकडून पेटीएम वॉलेट बॅलन्स, पेटीएम पोस्टपेड, यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा सर्व प्रकारच्या पेमेंट मोडवर घेतले जात आहेत. मात्र हा सरचार्ज सर्व वापरकर्त्यांकडून घेतला जात नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Online payments, Paytm

    पुढील बातम्या