जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI, HDFC, ICICI बँक खात्यांत मिनिमम बॅलेन्स मर्यादा किती? दंड टाळण्यासाठी चेक करा डिटेल्स

SBI, HDFC, ICICI बँक खात्यांत मिनिमम बॅलेन्स मर्यादा किती? दंड टाळण्यासाठी चेक करा डिटेल्स

SBI, HDFC, ICICI बँक खात्यांत मिनिमम बॅलेन्स मर्यादा किती? दंड टाळण्यासाठी चेक करा डिटेल्स

Bank Rules: कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर, तुमच्या खात्यात मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स राखणे आवश्यक आहे. मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स अंतर्गत, बँकेने निश्चित केलेली शिल्लक खात्यात ठेवली पाहिजे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 सप्टेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC किंवा ICIC बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. खाते उघडल्यावर राष्ट्रीयीकृत बँकांच्या वतीने ग्राहकांना अनेक मोठ्या सुविधा दिल्या जातात. पण या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतात. मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स मेंटेन करणे आवश्यक कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर, तुमच्या खात्यात मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स राखणे आवश्यक आहे. मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स अंतर्गत, बँकेने निश्चित केलेली शिल्लक खात्यात ठेवली पाहिजे. ही शिल्लक राखता न आल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. प्रत्येक बँक मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स ठरवते, ग्राहकाला नेहमी त्या मर्यादेपर्यंत खात्यात पैसे ठेवणे आवश्यक असते. काही बँकांच्या मर्यादा समान बँकांची स्वतःची निश्चित सरासरी किमान शिल्लक असते. मात्र काही बँकांची मर्यादा समान आहे तर काहींची वेगळी आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या मिनिमम बॅलन्सबद्दल आज सांगणार आहोत. Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? तज्ज्ञांकडून समजून घ्या दरकपातीला कोणते घटक ठरतील कारणीभूत SBI मध्ये किती शिल्लक राखणे आवश्यक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या बचत खात्यात मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स किती ठेवावे, हे तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे. SBI च्या खात्यातील शिल्लक मर्यादा शहरानुसार एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांपर्यंत आहे. ग्रामीण भागासाठी, हे 1,000 रुपये आहे, जर तुमचे खाते निमशहरी भागातील शाखेत खाते असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यात 2,000 रुपये ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3,000 रुपये आहे. HDFC च्या खात्यातील मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स HDFC मधील मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स मर्यादा तुमच्या निवासस्थानावर अवलंबून असते. शहरांमध्ये ही मर्यादा 10,000 रुपये आहे. त्याच वेळी, निमशहरी भागात 5,000 रुपये आणि ग्रामीण भागात 2,500 रुपयांची मर्यादा आहे. निवृ्त्तीनंतर चांगली पेन्शन हवीय? पाहा PPF आणि NPS पैकी कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर ICICI बँक मर्यादा आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात, एचडीएफसी प्रमाणेच किमान शिल्लक ठेवली पाहिजे. येथे शहरी भागातील खातेदारासाठी 10,000 रुपये, निमशहरीसाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये मर्यादा राखणे आवश्यक आहे. काही विशेष बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम लागू होत नाही. अशा बँक खात्यांमध्ये प्रधानमंत्री जन धन योजनेशी जोडलेली खाती, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट, पेन्शनधारकांची बचत खाती, सॅलरी अकाऊंट आणि अल्पवयीन मुलांची बचत खाती यांचा समावेश होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात