जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Loan : इथे मिळतंय सर्वात स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या फायदे-तोटे

Gold Loan : इथे मिळतंय सर्वात स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या फायदे-तोटे

Gold Loan : इथे मिळतंय सर्वात स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या फायदे-तोटे

सरकारी बँकेकडून स्वस्त व्याजदराने गोल्ड लोन घेता येतं, असं अर्थतज्ज्ञांचं (Economists) म्हणणं आहे. बिगर बँकिंग कंपन्यांकडून गोल्ड लोन घेणं तुलनेनं महाग पडतं.

    नवी दिल्ली, 7 मार्च : सामान्य माणसाच्या आयुष्यात कधीना कधी आर्थिक संकट (Financial Crisis) येतं. अशा काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक (Gold Investment) फायद्याची ठरते. भारतातील जवळपास सर्व मध्यमवर्गीय कुटुंबांकडे सोनं असतं. कठीण काळात गोल्ड लोन (Gold Loan) घेण्यासाठी हे सोनं खूप उपयुक्त ठरतं. कारण, पर्सनल लोनपेक्षा (Personal Loan) गोल्ड लोन स्वस्त आहे. तुम्हीही येत्या काही दिवसांत गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या बँकांमध्ये सर्वांत स्वस्त गोल्ड लोन मिळत आहे याची माहिती असणं आवश्यक आहे. कसं मिळतं गोल्ड लोन - एखाद्या वित्तीय संस्थेकडून (Financial Institution) कर्ज घेताना तुम्ही पर्सनल लोनऐवजी गोल्ड लोन घेऊ शकता. जर तुम्ही गोल्ड लोन घेण्याची तयारी करत असाल तर ते घेण्यापूर्वी विविध वित्तीय संस्थांतील व्याजदरांची (Interest Rate) नक्कीच तुलना करून पहा. सरकारी बँकेकडून स्वस्त व्याजदराने गोल्ड लोन घेता येतं, असं अर्थतज्ज्ञांचं (Economists) म्हणणं आहे. बिगर बँकिंग कंपन्यांकडून गोल्ड लोन घेणं तुलनेनं महाग पडतं. लोन अमाउंट कशाप्रकारे निश्चित केली जाते तुम्ही घेतलेल्या लोनची पूर्ण परतफेड करेपर्यंत बँका तुमच्या सोन्याचं संरक्षण करतात. तुम्ही तारण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम फंड लोन म्हणून घेऊ शकता. तुमच्या दागिन्यांच्या शुद्धतेनुसार (Purity of Jewelry) ही किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते. तुमच्या सोन्याची बाजारातील किंमत जितकी जास्त असेल तितकी लोनची रक्कम जास्त असेल. त्यामुळे लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी सोन्याची सध्याची बाजारातील किंमत (Gold Rate) तपासली पाहिजे. या आधारावर, सोन्यावरील कर्जाची रक्कम मोजणं आवश्यक आहे. तुमच्या गोल्ड लोनचा कालावधी (Gold Loan Duration) किमान तीन महिन्यांपासून कमाल 48 महिन्यांपर्यंतचा असू शकतो. तुम्ही गोल्ड लोनसाठी निवडलेल्या मुदतीनुसार व्याजाचा हिशोब करू शकता. दोन वर्षांच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर सर्वांत कमी व्याजदर कुठे उपलब्ध आहेत, याबाबत खाली माहिती दिलेली आहे.

    हे वाचा -  18 महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला Gold Rate, चांदीचा भावही वधारला

    या बँकांमध्ये मिळतं सर्वांत स्वस्त गोल्ड लोन  फेडरल बँक 6.99 टक्के व्याजदर पंजाब अँड सिंध बँक 7 टक्के व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया 7 टक्के व्याजदर पंजाब नॅशनल बँक 7.25 टक्के व्याजदर कॅनरा बँक 7.35 टक्के व्याजदर इंडियन बँक 8 टक्के व्याजदर बँक ऑफ बडोदा 9 टक्के व्याजदर करुर वैश्य बँक 9.50 टक्के व्याजदर बजाज फिनसर्व्ह 11 टक्के व्याजदर मुथूट फायनान्स 11.90 टक्के व्याजदर कोणाला मिळू शकतं गोल्ड लोन  18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपलं सोनं गहाण ठेवून गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकते. गोल्ड लोन घेण्यासाठी, तुम्हाला पासपोर्ट फोटोसह एक आयडेंटिटि प्रूफ (Identity Proof) (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड) आणि अॅड्रेस प्रूफ (Address Proof) (वीज आणि फोन बिल) सादर करावं लागतं. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही Form 60 सबमिट करू शकता.

    हे वाचा -  महागाईनंतर सर्वसामान्यांना बसणार GST चा फटका? टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार?

    गोल्ड लोनचे फायदे - गोल्ड लोनचे व्याजदर पर्सनल लोनपेक्षा कमी असतात. - गोल्ड लोनमध्ये सोनं गहाण ठेवून पैसे मिळत असल्याने खूप कमी काळात लोन अप्रूव्ह होतं. - होम लोन किंवा दुसऱ्या कुठल्याही लोनसाठी तुमचा सिबिल (CIBIL) म्हणजे क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक असतं. पण, गोल्ड लोनसाठी क्रेडिट हिस्ट्रीची आवश्यकता नसते. - गोल्ड लोन घेण्यासाठी कोणतंही प्रमाणपत्र किंवा गॅरंटीची आवश्यकता नसते. - होम लोन किंवा पर्सनल लोनप्रमाणे गोल्ड लोनमध्ये प्री-पेमेंट पेनल्टी (Pre-payment Penalty) नसते. एकूणच इतर कुठल्याही लोनच्या तुलनेत गोल्ड लोन जास्त फायद्याचं ठरतं. त्यामुळे तुम्ही जर लोन घेण्याचा विचार करत असाल तर गोल्ड लोन हा चांगला पर्याय ठरू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात