
पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टींमध्ये बदल होणार आहे. (important rules changes from 1st October).ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर तुमची बँक तसंच पगाराशी संबधित काही नियमात बदल होणार आहेत. तर बँकिंग नियमांपासून एलपीजी (एलपीजी किंमत) पर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे..


2.1 ऑक्टोबरपासून नाही चालणार जुनं चेकबुक (Cheque book rules)- तुम्ही जर ओरिएंटल बँक (Oriental bank -OBC), अलाहाबाद बँक (Allahabad Bank) आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India - UBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबरपासून या बँकांचे जुने चेकबुक रद्द होणार आहे. या बँकांने 1 एप्रिल 2020 पासून इतर बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे या बँकांचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून अमान्य असणार आहे. या तीन्ही बँकांच्या ग्राहकांचे चेकबुक आणि बँकांचा MICR कोड इनव्हॅलिड होईल. बँकांच्या विलीनीकरणामुळे, खातेधारकांचा खाते क्रमांक, IFSC आणि MICR कोडमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग प्रणाली जुने चेकबुक नाकारेल.







