मुंबई 12 नोव्हेंबर : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराने महागाईमध्ये चांगलीच भर टाकली आहे. मध्यंतरी विविध राज्यांची सरकारं आणि केंद्र सरकारने टॅक्स कपात करून इंधनाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरीही बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळपास आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. क्रूड ऑइलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर पुन्हा एकदा 95 रुपये प्रति बॅरलच्या वर पोहोचले आहेत; पण पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप स्थिर आहेत. त्यात वाढ किंवा घट झालेली नाही. अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली तेव्हा भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले नाहीत; पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ नोंदवली जात असून, तेव्हा इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 12 नोव्हेंबरला पेट्रोलचे दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर असे होते. IOCL या भारतीय पेट्रोलियम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीशी संलग्न असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे. याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये पेट्रोलचा भाव 96.57 रुपये आणि डिझेलचा भाव 89.76 रुपये प्रति लिटर असा आहे. वाढत्या महागाईला लागणार ब्रेक! लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? चारपैकी तीन महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर शंभरच्या वर सध्या पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातल्या चार महानगरांचा विचार करता दिल्लीत पेट्रोल 96.72 पैसे प्रति लिटरप्रमाणे विकले जात आहे. डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31, तर डिझेलचा भाव 94.27 पैसे प्रति लिटर आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 व डिझेल 92.76 रुपये प्रतिलिटर व चेन्नईत पेट्रोल 102.63 आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये, डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 108.48, डिझेल 93.72 रुपये, भोपाळमध्ये पेट्रोल 108.65, डिझेल 93.90 रुपये, तिरुवनंतपुरमला पेट्रोल 107.71 आणि डिझेल 96.52 रुपये, पाटण्यामध्ये पेट्रोल 107.24 व डिझेल 94.05 रुपये, बेंगळुरूत पेट्रोल 101.94, डिझेल 87.89 रुपये, भुवनेश्वरला पेट्रोल 10.19 व डिझेल 94.76 रुपये, चंदीगडला पेट्रोल 96.20 आणि डिझेल 84.26 रुपये, हैदराबादला पेट्रोल 109.66, डिझेल 97.82 रुपये, पोर्टब्लेअरला पेट्रोल 84.10, डिझेल प्रति लिटर 79.74 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे. कमी गुंतवणुकीत रोज हजार रुपये कमवण्याची संधी; जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ व्यवसाय पेट्रोल, डिझेलचे दर कधीपासून आहेत स्थिर भारतात मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोलवर 6 रुपये आणि डिझेलवर 8 रुपये एक्साइज ड्युटी कमी केली होती. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या आधारावर ऑइल मार्केटिंग कंपन्या इंधनाचे दर निश्चित करत असतात. एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शहरातल्या पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. शहरातले इंधनाचे दर माहिती करून घेण्यासाठी इंडियन ऑइलच्या ग्राहकांना RSP कोड लिहून तो 9224992249 या नंबरवर पाठवावा लागतो. त्यानंतर दर कळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.