मराठी बातम्या /बातम्या /मनी /सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, औषधांच्या किमतीमध्ये एप्रिलपासून मोठी वाढ!

सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, औषधांच्या किमतीमध्ये एप्रिलपासून मोठी वाढ!

महागाईच्या या काळात नागरिकांना आता औषधांसाठीही अधिकचे पैसे मोजावे (Hike in Prices of Medicines) लागणार असल्याची शक्यता आहे. सरकरानं औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना किमतीत वाढ करण्याची मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली 20 मार्च : देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या वाढत्या किमतीनं आधीच हैराण असलेल्या नागरिकांसाठी आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महागाईच्या या काळात नागरिकांना आता औषधांसाठीही अधिकचे पैसे मोजावे (Hike in Prices of Medicines) लागणार असल्याची शक्यता आहे. नॅशनल फार्मस्यूटीकल प्राइसिंग ऑथिरीटीनं शुक्रवारी याबाबत माहिती देताना म्हटलं, की सरकरानं औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये (Wholesale Price Index) 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची मान्यता दिली आहे. पेनकिलर म्हणजेच वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, अँटीइन्फ्लाटीव, कार्डियक आणि अँटीबायोटीक्ससह इतर आवश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे.

२० टक्क्यांनी वाढू शकतात किमती -

सरकारनं वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. ड्रग्स प्राइस रेगुलेटर, नॅशनल फार्मास्यूटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीनं शुक्रवारी म्हटलं, की सरकारच्यावतीनं 2020 साठी डब्लूपीआयमध्ये 0.5 टक्क्यांचा बदल करण्यास मान्यता दिली आहे. तर फार्मा इंडस्ट्रीचं असं म्हणणं आहे, की मॅनिफॅक्चरींगच्या खर्चात पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे कंपन्या किमतीत वीस टक्के वाढीची योजना आखत आहेत.

देशात औषधांच्या निर्मितीसाठी लागणारा बहुतेक कच्चा माल हा चीनमधूनच येत असतो. कोरोना महामारीमुळे या गोष्टीला मोठा फटका बसला आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील लोकांच्या म्हणण्यानुसार, औषध निर्मितीसाठीचा कच्चा माल जर्मनी तसंच सिंगापूरमधूनही येतो. मात्र, चीनच्या तुलनेत याठिकाणाहून आयात केल्या जाणाऱ्या मालाची किंमत जास्त असते. याच कारणामुळे बहुतेक कंपन्या चीनवरुन माल आयात करतात. अँटीबायोटीक गोळ्यांसाठी लागणारा बहुतेक कच्चा मालही चीनमधूनच आणला जातो. नुकतंच सरकारनं हेपरिन इंजेक्शनच्या किमतीमध्येही वाढ केली आहे. याचा उपयोग कोरोनावरील उपचारासाठीही केला जातो. चीनमधून एपीआयच्या आयती करात झालेल्या वाढीनंतर सरकारनं मागच्या वर्षी जूनमध्ये हेपरिनच्या किमतीत पन्नास टक्के वाढीला परवानगी दिली होती.

First published:
top videos

    Tags: Generic medicine, Health, Money, Price hike, Wellness