नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : कोरोना काळापासून केंद्र सरकारनं रोखलेल्या महागाई भत्त्यातील फरक या (Central government employees may get difference in DA soon) महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशावर कोरोनाचं संकट आल्यापासून केंद्रानं कर्मचाऱ्यांचा (DA allowance hold since corona begins) महागाई भत्ताच दिलेला नाही. मात्र सप्टेंबर महिनाअखेरील कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरअखेर सरकारी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे डबल बोनस मिळेल, अशी माहिती समोर येत असून सरकारनं 28 टक्क्यांपर्यंत (28 percent hike in DA) वाढवलेल्या डीएचादेखील यात समावेश असणार आहे.
सरकारनं जारी केले आदेश
केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगाराच्या तुलनेत घरभत्ता आणि डीएमध्ये वाढ देण्यात यावी, असे आदेश सरकारनं काढले आहेत. प्रचिलत नियमांनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर त्याला एचआरएमध्ये वाढ द्यावी लागत होती. त्यामुळे सरकारने आता ही मर्यादा वाढवली असून ती 25 टक्क्यांवरून 27 टक्क्यांवर आणली आहे. मात्र आता 1 जुलै 2021 पासून महागाई भत्तादेखील 28 टक्के झाल्यामुळे एचआरए वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय सरकारकडे उरलेला नाही.
हे वाचा - Shaving करू नका, ट्रिमरही वापरू नका! तालिबानच्या सर्व सलून चालकांना सूचना
कुणाला किती HRA?
शहरी आणि ग्रामीण विभागात एचआरएचं प्रमाण वेगवेगळं ठेवण्यात आलं आहे. शहरी विभागात शहरांच्या प्रकारानुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए दिला जातो. ही वाढदेखील 1 जुलैपासनच लागू करण्यात आली आहे. घराचा भत्ता हा एक्स, वाय आणि झेड या शहरांच्या दर्जानुसार दिला जातो. एक्स श्रेणीतील शहरांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 5400 रुपये एचआरए मिळेल. वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 3600 रुपये तर झेड श्रेणीसाठी 1800 रुपये दर महिन्याला भत्ता मिळणार आहे. जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के डीएच्या हिशोबाने सर्वसाधारणपणे 1980 रुपयांची वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Salary