मुंबई : घर खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. नुसतं घर घेण्यासाठीच नाही तर आता घराची डागडुजी करणं किंवा एकूणच बांधकाम महाग होणार आहे. महागाईमध्ये सर्वसामान्य लोकांना आणखी एक झटका बसला आहे. भारतातील काही क्षेत्रात सिमेंटच्या किंमती वाढल्या आहेत. याबाबत कंपनीने महत्त्वाची घोषणा केली.
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. दक्षिण भारतातील सिमेंट कंपन्यांनी भाववाढीची घोषणा केली आहे. सोमवार म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून प्रति बॅग ३० रुपयांनी भाव वाढले आहेत. CNBC ने दिलेल्या वृत्तानुसार या घोषणेनंतर सिमेंट कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. रेम्को सिमेंट २ टक्क्यांनी, इंडिया सिमेंट सुमारे ३ टक्क्यांनी वधारले आहे.
खुशखबर! या बँका FD वर 7% पेक्षा देतायत जास्त व्याज, तुमची बँक आहे का?
आंध्र, तेलंगणात सिमेंटच्या दरात प्रति बॅग २०-३० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर तामिळनाडूत सिमेंटच्या दरात प्रति बॅग २०-३० रुपयांनी वाढ झाली आहे. कर्नाटकातही 20 ते 30 रुपयांनी भाव वाढले आहेत.
सिमेंटचे दर वाढल्याने ग्राहकांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. नवीन घर बांधण्याचा खर्च वाढेल. या वाढीव खर्चाचे कारण देऊन बिल्डर फ्लॅट अधिक महाग करू शकतात. ईएमआय महाग करण्यासाठी सामान्य लोकांवर आधीच दबाव असतो. अशा परिस्थितीत सिमेंटच्या दरवाढीमुळे ते अडचणीत येऊ शकतात.
तुमच्या फोनमध्ये NPS शी संबंधित माहिती ठेवा सुरक्षित, डिजिलॉकरद्वारे उघडा खाते, अशी आहे प्रक्रिया
आयआयएफएल सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सिमेंट कंपन्या पुढील डिसेंबरपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात 6-8 टक्क्यांनी किंमती वाढवू शकतात. खरं तर सिमेंट तयार करण्याचा खर्च वाढला असून कंपन्या ग्राहकांवर वाढीव इनपुट कॉस्टची भरपाई करण्यासाठी काही भार टाकू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.